Categories: Featured कृषी राजकीय सामाजिक

अवधूत वाघ सारख्या नेत्यांना लावारिस करण्याचे काम शेतकऱ्यांची पोरंच करतील – डॉ. अजित नवले

कोल्हापूर (२९ मार्च) : लायकी आणि अक्कल नसणाऱ्यांना सत्ता मिळाली की काय होते, याचा उत्तम नमुना म्हणजे  बेताल व निंदनीय वक्तव्य करणारे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ असल्याचे शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी म्हणटले आहे. 

या नमुन्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि समाजकारणातून कायमचे लावारीस करण्याचे काम आता शेतकऱ्याची मुलेच करतील.. अशा शब्दात अजित नवले यांनी अवधूत वाघ यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 

भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटरवरुन शेतकऱ्यांच्या मुलांबाबत केलेल्या विधानामुळे त्यांचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. भाजपचे अनेक नेते, प्रवक्ते अशा प्रकारची विधाने करण्यात पटाईत असून त्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही. मग ते शेतकऱ्यांना साले म्हणणारे दानवे असोत अथका सैनिकांच्या पत्नींविषयी असभ्य भाषा वापरणारे परिचारक असोत. या सर्व नेत्यांची भाषाच त्यांच्यावरील संस्काराची  जाणीव करून देत असून, या असंस्कारी नेत्यांना राजकारण आणि समाजकारणातून देखील कायमचे लावारिस करण्याची खरी गरज असल्याचे या निमित्ताने सोशल मिडीयावर देखील चर्चिले जात आहे. 

आत्महत्याग्रस्तशेतकऱ्याचीमुलेअनाथम्हणजेलावारिसअसतातबाबा
हागणारानाहीतरबघणारालाजतोhttps://t.co/XHOP9TIp9A

चौकीदार Avadhut Wagh (@Avadhutwaghbjp) March 28, 2019

काही दिवसांपूर्वीच या बेताल वाघाने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विष्णूचा अकरावा अवतार’ असल्याचे म्हणटले होते. त्यांच्या या नेहमीच्याच वादग्रस्त विधानांमुळे भाजप देखील अनेकदा तोंडघशी पडत असल्याने पक्षाने त्यांना कोणत्याही माध्यमांशी बोलण्यास बंदी देखील घातली होती.

माध्यमांशी बोलण्यास घातलेली बंदी जिव्हारी लागलेल्या बेताल वाघांनी ट्विटर सारख्या सोशल मिडीयाचा वापर करत आपली टिवटिव पुन्हा केलीय. त्यामुळे त्यांच्या या बेताल वक्तव्याची पक्षीय पातळीवर कशी दखल घेतली जाते आणि त्यांच्यावर काय कारवाई होते हे पहावे लागणार आहे. 

By Lokshahi.News

Team Lokshahi News