Categories: Featured राजकीय

जत भाजपमधील गटबाजी उघड, दोन्ही गटांनी मांडल्या बैठकीच्या वेगळ्या चुली

सांगली (२६ मार्च) : लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु होताच, आज जत येथे भाजपमधील गटबाजी उघड झाली आहे. भाजपचे नेते जत दौऱ्यावर येणार असल्याने आ. जगताप गट व त्यांना विरोध करणाऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या बैठका घेत आपली वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे जतच्या राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्याने जतमध्ये आ.विलासराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. आ.जगताप यांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन केल्याचे समजताच जगताप यांच्यावर नाराज असलेल्या गटाने तातडीने दुसऱ्या बैठकीचे नियोजन केले. नाराज मंडळींनी अवघ्या काही तासात बैठकीचे नियोजन करून, बैठकीस बूथ कमिटी प्रमुखाना बोलावले. दोन्ही गटांनी एकाच दिवशी बैठकीस बोलावल्याने, त्यामुळे पक्षश्रेष्ठींचीही चांगलीच पंचाईत झाल्याचे दिसून आले. 

जत भाजपमध्ये आ. जगताप गटाने हुकूमशाही सुरू केली आहे. पाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना, आम्हाला लक्ष केले जात आहे. आम्ही  भाजपचे स्वाभिमानी कार्यकर्ते असून, आम्हालाच डावलले जात आहे. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असे सांगत यापुढे हुकूमशाही खपवून घेणार नसल्याचा इशाराही यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. 

By Lokshahi.News

Team Lokshahi News