राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर, स्वाभिमानी संघटनेला सोडली एक जागा

मुंबई (१४ मार्च) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. परंतु सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ मतदार संघातील उमेदवार मात्र जाहीर करण्यात आलेला नाही. या यादीत पार्थ पवारांचे नाव नसल्याने या यादीने चर्चेला मात्र उधाण आले आहे.

राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या यादीत बारामती येथून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रायगडमधून सुनील तटकरे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्यासह एकूण ११ जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही यादी जाहीर केली.

पार्थ पवार यांच्या नावाबाबत जयंत पाटील यांनी योग्य तेव्हा त्याबाबतचा निर्णय घेऊन, योग्य वेळी नाव जाहीर केले जाईल असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपण पार्थसाठी माघार घेतल्याचे सांगितले होते. तरीही पहिल्या यादीत पार्थ पवार यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. दरम्यान, खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदार संघाची जागा सोडण्यात आली आहे. याठिकाणी राष्ट्रवादीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा जाहीर केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी खालीलप्रमाणे 

बारामतीसुप्रिया सुळे

२) रायगड  सुनील तटकरे

) सातारा  उदयनराजे भोसले

) कोल्हापूरधनंजय महाडिक

) बुलडाणाडॉराजेंद्र शिंगणे

) जळगावगुलाबराव देवकर

) परभणीराजेश वीटेकर

८) मुंबई उत्तरपूर्वसंजय दिना पाटील

ठाणेआनंद परांजपे

१०) कल्याणबाबाजी बाळाराम पाटील

११) लक्षद्वीपमहमंद फैजल