Categories: Featured राजकीय

विनायक राऊतांवर दलालीचा आरोप, राणे – राऊत संघर्षाने कोकणातील वातावरण तापले

सिंधुदुर्ग (२६ मार्च) : रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात पारंपरिक आणि पर्ससीन मच्छीमारांच्या वादाने आता राजकीय वळण घेतले आहे . या वादातील दोन्ही गटाच्या मच्छीमारांची मते आपल्यालाच मिळविण्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात घमासान सुरू झाले आहे. त्यामुळे कोकणातील वातावरण आरोप प्रत्यारोपानी गरम झाल्याचे पहायला मिळत आहे. 

कोकण किनारपट्टीवर पारंपरिक मच्छीमार मोठ्या संख्येने आहेत. पण गेल्या काही वर्षापासून पारंपरिक आणि पर्ससीन मच्छीमारांच्या वादात कोकण किनारपट्टीवरील वातावरण चिघळले आहे. पारंपारिक मच्छीमारांचा पर्ससीन मच्छीमारीस विरोध आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत पारंपरिक मच्छीमारांची मते निर्णायक ठरु शकतात. याची जाणीव राउत आणि राणे दोघांनाही आहे . त्यामुळेच आपण पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने आहोत असे आश्वासन राउत देत आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार निलेश राणे यांच्या वतीने नितेश राणे यानी विनायक राउतांवर दलालीचा आरोप केला आहे. 

नितेश राणेंच्या या आरोपावर विनायक राउत यानी नारायण राणेंच्या विधानाचेच उदाहरण देत, जोरदार टिका केलीय . मच्छीमाराना तडीपार करायला निघालेल्या राणेना  पारंपरिक मच्छीमारांचा असलेला कळवळा पोकळ असल्याचे सांगत पारंपरिक मच्छीमार शिवसेनेच्याच बाजूने असल्याचा दावा राऊतांनी केला आहे.

या सगळ्या पार्श्वभुमीवर पारंपरिक मच्छीमारांच्या प्रतिनिधीनी तातडीची बैठक घेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. आत्तापर्यंत पारंपरिक मच्छीमारांचा राजकीय पक्षाकडुन वापरच करुन घेण्यात आला असल्याचे सांगत पारंपरिक मच्छीमार आपली भुमिका पंधरा एप्रिलला स्पष्ट करतील असे मच्छीमारांच्या प्रतिनिधीनी सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अजुन तरी जोर आलेला नाही पण येत्या काही दिवसात मच्छीमारांच्या प्रश्नावरुन या मतदारसंघातल वातावरण आणखी तापणार असून त्याची झलक आतापासूनच पहायला मिळू लागली आहे.

By Lokshahi.News

Team Lokshahi News

Recent Posts

  • बातम्या

१ डिसेंबरला शाळा सुरू होणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई | कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनने सध्या संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे सर्व देशांनी पूर्वकाळजी घेत निर्बंध लावण्यास… Read More

November 29, 2021
  • नोकरी

ITI धारकांना सुवर्णसंधी; विद्युत विभागात 334 रिक्त पदांची भरती

पणजी | गोवा विद्युत विभाग येथे असिस्टंट लाइनमन/ वायरमन आणि लाइन हेल्पर पदांच्या एकूण 334 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.… Read More

November 29, 2021
  • नोकरी

उत्पादन शुल्क विभाग गोवा येथे 12 वी/पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी

पणजी | उत्पादन शुल्क विभाग गोवा अंतर्गत उत्पादन शुल्क निरीक्षक, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कनिष्ठ लघुलेखक, सहायक उत्पादन शुल्क रक्षक पदांच्या 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार… Read More

November 28, 2021
  • नोकरी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे 138 रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा

गडचिरोली | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, अधीक्षक, महिला अधिक्षिका, पदव्युत्तर… Read More

November 28, 2021
  • नोकरी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरू, ‘असा’ करा अर्ज

मुंबई | सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदाच्या 115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत… Read More

November 28, 2021
  • नोकरी

CDAC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 09 डिसेंबर पर्यंत ‘या’ ठिकाणी करा अर्ज

मुंबई | प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई (CDAC) मुंबई येथे प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज… Read More

November 28, 2021
  • नोकरी

ITI धारकांना नोकरीची सुवर्णसंधी – 2070+ पदांसाठी भरती

पुणे | आयटीआय धारकांना नोकरीची चांगली संधी मिळत असून पुणे येथे मेकॅनिक मोटार वाहन / डिझेल मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / फिटर /… Read More

November 28, 2021
  • नोकरी

10 वी/ ITI, पदवीधर उत्तीर्णांना भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी

मुंबई | भारतीय तटरक्षक दल अंतर्गत मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, फोर्क लिफ्ट ऑपरेटर, एमटी फिटर, फायरमन, इंजिन ड्रायव्हर, मल्टी टास्किंग स्टाफ, लस्कर पदांच्या एकूण 19… Read More

November 27, 2021
  • नोकरी

10 वी ते पदवी उत्तीर्णांना भारतीय हवाई दलात नोकरीची संधी

नवी दिल्ली | भारतीय हवाई दल अंतर्गत कमिशन्ड अधिकारी पदाच्या एकूण 317 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने… Read More

November 27, 2021
  • नोकरी

महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय अंतर्गत 413 रिक्त पदांची भरती

मुंबई | स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय येथे शहर समन्वयक, विभागीय तांत्रिक तज्ञ पदांच्या एकूण 413 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र… Read More

November 27, 2021