Categories: Featured राजकीय

वेळ आली की राजू शेट्टींच्या साऱ्या भानगडी बाहेर काढू – ना. चंद्रकांत पाटील

सांगली (२८ मार्च) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे आठ जागा मागितल्या होत्या. परंतु आघाडीने त्यांना ठेंगा दाखवत हातकणंगलेची एकच जागा दिली. त्यामुळे राजू शेट्टींना एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. जर एकाच जागेवर समाधान मानायचे होते, तर मग तिकडे जाऊन तुम्ही काय मिळवले? असा प्रश्न महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खा. राजू शेट्टी यांना विचारला आहे. ते औदुंबरच्या प्रचार सभेत बोलत होते. 

खासदार राजू शेट्टींचा सगळे मलाच पाहिजे हा अट्टाहास असतो. जर तुम्ही बुलढाणा किंवा शिर्डीची जागा पदरी पाडून घेतली असती तर आम्ही समजू शकलो असतो. आमचा मित्र रविकांत तुपकर याच्यासाठी तरी तुम्ही जागा घ्यायला हवी होती. परंतु तुम्ही त्यांना वाऱ्यावर सोडून आपला स्वार्थ साधलात. आता मात्र आम्ही तुमचा शेतकऱ्यांच्या कैवारीपणाचा बुरखा फाडणार आहोत. त्याचबरोबर वेळ आली की तुमच्या साऱ्या भानगडी बाहेर काढण्याचाही त्यांनी राजू  शेट्टी यांना इशारा दिला आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी वसंतदादांच्या वारसांचे आम्ही भाजप पक्षात पायघड्या घालून स्वागत करू असेही पाटील यांनी औदुंबरच्या प्रचार प्रारंभ सभेत सांगितले.

Team Lokshahi News