आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत शेतकऱ्यांसाठी १ लाख कोटी; असा मिळणार लाभ
Categories: Featured
आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत शेतकऱ्यांसाठी १ लाख कोटी; असा मिळणार लाभ
नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचा कोणाला कसा लाभ होईल यासंदर्भातील माहिती काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी २० लाख कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत मदत पॅकेजची माहिती दिली. यावेळी त्यांनी एकूण ९ घोषणा केल्या. यापैकी ३ घोषणा स्थलांतरित कामगार, २ छोटे शेतकरी आणि १-१ घोषणा मुद्रा लोन, फेरीवाले, घरे आणि आदिवासी क्षेत्रातील रोजगारांची संबंधीत आहेत.
आजही अर्थमंत्री निर्मला सीतारमन तिसऱ्यांदा या पॅकेजमधील लाभाची माहिती दिली. यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. काल पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की, पुढील घोषणा शेतकऱ्यांसाठी असतील. यावेळी त्यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांना विसरलेले नसल्याचे सांगितले होते. आज सितारामण यांनी शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटींचं पॅकेज देण्यात आल्याची घोषणा केली. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. खाद्य पदार्शांशी संबंधित उद्योगांना १० हजार कोटींची मदतही जाहीर करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी गेल्या दोन महिन्यांत अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत असंही निर्मला सीतारामन यांनी यावेळी स्पष्ट केले. दोन महिन्यात म्हणजेच लॉकडाउनच्या काळात ७४ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची धान्य खरेदी करण्यात आल्याचेही सीतारामन यांनी स्पष्ट केले. ५६० लाख लीटर दुधाचे संकलन करण्यात आले. देशातल्या २ कोटी शेतकऱ्यांना व्याजावर सबसिडी देण्यात आली आहे. दूध उत्पादकांना लॉकडाउनच्या काळात ४ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम दिल्याचेही त्या म्हणाल्या.
पॅकेजचा तिसरा टप्पा
१) कृषी पायाभूत सुविधांसाठी
प्रधानमंत्री किसान सन्मान अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार ७०० कोटी रुपये टाकले.
लॉकडाउनदरम्यान ५६०० लाख दुध कॉपरेटिव्ह संस्थांनी खरेदी केले.
दुध उत्पादकांना ४१०० कोटी रुपये मिळाले.
कृषी पायाभूत सुविधांसाठी १ लाख कोटी रुपये दिले जातील.
यातून कोल्ड चेन, पिक कापणीनंतर व्यवस्थापनाची सुविधा मिळेल आणि शेतकऱ्यांची कमाईदेखील वाढेल.
२) फूड प्रोसेसिंस
मायक्रो फूड एंटरप्राइजेजसाठी १० हजार कोटी रुपये फंडची स्कीम आहे, ही क्लस्टर बेस्ड असेल.
यातून २ लाख खाद्य प्रसंस्करणला लाभ मिळेल. लोकांना रोजगार मिळेल.
३) फिशरीज
मत्स्य संपदा योजनेची घोषणा बजेट दरम्यान करण्यात आली होती, याला लागू करत आहोत.
यातून ५० लाख लोकांना रोजगार मिळेल. भारताचा एक्सपोर्ट वाढेल.
मत्स्य पालन वाढवण्यासाठी मच्छीमारांना जहाज आणि त्याचा विमा दिला जाईल.
समुद्री आणि आंतरराष्ट्रीय मत्स्य पालनासाठी ११ हजार कोटी रुपये आणि ९ हजार कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी जारी केले जातील.
४) पशुपालन
केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकुर म्हणाले की, अनेक आजारांसाठी जनावरांना व्हॅक्सीन मिळत नाही.
यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. सर्व जनावरांचे व्हॅक्सीनेशन केले जाईल.
व्हॅक्सीनेशनमध्ये १३ हजार ३४३ कोटी रुपये खर्च होतील.
यातून ५३ कोटी पशुधनाला आजारापासून मुक्ती मिळेल.
जानेवारीपासून आतापर्यंत १.५ कोटी गाय आणि म्हशींना व्हॅक्सीन लावण्यात आले.
पशुपालनाच्या पायाभूत सुविधांसाठी १५ हजार कोटी रुपयांचा फंड दिला जाईल.
५) औषधी शेती
हर्बल शेतीसाठी ४ हजार कोटी रुपये मंजुर केले आहेत.
पुढील दोन वर्षात १० लाख हेक्टर जमिनीवर औषधीय शेती होईल.
या शेतीतून शेतकऱ्यांना ५ हजार कोटी रुपयांचे कमाई होईल.
Tags: 6000 ruppees PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 आत्मनिर्भर भारत अभियान एलजी डायरेक्टरी किसान कॉल सेंटर योजना किसान क्रेडिट कार्ड नवीनीकरण किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किसान कॉल सेंटर