नवी दिल्ली। देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना यात सर्वाधिक रूग्ण हे तब्लिगी जमातीशी संबधित असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलय. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी तब्बल ३० टक्के लोक तब्लिगीशी निगडीत आहेत. देशातील १७ राज्यात तब्लिगीशी निगडीत एकूण १०२३ लोक कोरोनाने बाधित झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
तब्लिगी जमातीशी निगडीत एकूण २३ हजार लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे, याची माहिती गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण तब्लिगी जमातीमधील असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.