Categories: आरोग्य

14 Dec. 2020 : कोल्हापूर जिल्हा कोरोना रिपोर्ट

कोल्हापूर | जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार 12 अहवाल पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 203 प्राप्त अहवालापैकी 181 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 1 आहे. (16 अहवाल नाकारण्यात तर  5 नमुना अहवाल पुन्हा सादर). ॲन्टीजेन चाचणीचे 70 प्राप्त अहवालापैकी 69 निगेटिव्ह तर पॉझीटिव्ह 1 आहेत. खासगी रुग्णालये/लॅबमध्ये 140 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 130 तर 10 पॉझीटिव्ह आहेत.

आज प्राप्त 12 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड- 1, गडहिंग्लज-1, करवीर–1, नगरपरिषद क्षेत्र-1 व कोल्हापूर महापालिका क्षेत्र-4 व  इतर राज्य 4 असा समावेश आहे. आज अखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 869, भुदरगड- 1229, चंदगड- 1212, गडहिंग्लज- 1476, गगनबावडा- 148, हातकणंगले-5306, कागल-1664, करवीर- 5640, पन्हाळा- 1860, राधानगरी-1241, शाहूवाडी-1355, शिरोळ- 2505, नगरपरिषद क्षेत्र-7450, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 15 हजार 5 असे एकूण 46 हजार 960 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 350 असे मिळून एकूण 49 हजार 310 रुग्णांची आज अखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 49 हजार 310 पॉझीटिव्हपैकी 47 हजार 505 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 122 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत. तर 1 हजार 693 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Team Lokshahi News