Categories: कृषी

PM किसानः ७ कोटी ९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ हजार ८४१ कोटी रूपये जमा – कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर

नवी दिल्ली। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत देशातील ७ कोटी ९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ हजार ८४१ कोटी रूपये जमा केल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. 

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारा २ हजार रूपयांचा हप्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच देण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केली होती. त्यामुळे एप्रिलच्या शेवटी दिला जाणारा हप्ता मुदतीआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यास सुरवात झाली आहे. ७ कोटी ९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ हजार ८४१ कोटी रूपये जमा झाले आहेत.

लॉकडाऊनमुळे देशातील शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे, त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलले असून त्याचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रूपये ३ हप्त्यात दिले जात आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने देशातील गरीब महिलांच्या जनधन खात्यात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातूनही प्रतिमहिना ५०० रूपये देणे सुरू केले असून त्याची अंमलबजावणी ३ एप्रिल ते ९ एप्रिलच्या कालावधीत करण्यात आली आहे. 

Rajendra Hankare

Share
Published by
Rajendra Hankare
Tags: 6000 ruppees PM KISAN SAMMAN YOJANA buy insurance Farmer loan get insurance Insurance KISAN SAMMAN YOJANA online crop loan ONLINE PM KIsan PM KISAN LIST PM KISAN LIST 2019 PM KISAN LIST 2020 PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA PM KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 PRADHAN MANTRI KISAN SAMMAN NIDHI YOJANA 2019 एलजी डायरेक्टरी किसान सम्मान निधि योजना पीएम किसान पीएम किसान निधि योजना पीएम किसान पोर्टल पीएम किसान योजना लिस्ट पीएम किसान समाधान योजना पीएम किसान सम्मान निधि योजना पीएम किसान सम्मान योजना लिस्ट पीएम-किसान योजना प्रधानमंत्री किसान निधि योजना फार्म प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मोदी सरकार मोदी सरकार की योजना