Categories: कृषी

पीएम किसान योजनेचे १७ हजार कोटी वितरित – पंतप्रधान मोदींकडून घोषणा

महत्वाच्या लिंक –
लाभार्थ्यांच्या खात्याचा तपशील
लाभार्थी यादी
नवीन नाव नोंदणी
आधार अपडेट

नवीदिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधी योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ६ व्या हप्त्याची घोषणा केली असून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभांतरणाच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जात आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कृषि क्षेत्राचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी देशातील कृषि क्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी १ कोटीच्या निधीची घोषणा केली. यावेळी त्यांनी पीएम किसान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यापोटी १७ हजार कोटी रूपये वितरित करताना आनंद होत असल्याचे स्पष्ट केले. भगवान बलराम यांच्या जयंतीचे औचित्य साधून पीएम मोदींनी कृषि क्षेत्रासाठीच्या पायाभूत सुविधांसाठी विविध बाबींची घोषणा केलीय.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधी योजनेच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात ७५ हजार कोटी रूपये वितरित करण्यात आल्याचीही माहिती दिलीय. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही मोदी सरकारची सर्वात मोठी महत्वाकांक्षी योजना असून या योजनेचा देशातील १४.५ कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्या या योजनेचा लाभ ८.५ कोटी शेतकऱ्यांना होत आहे. तर १० कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेत नाव नोंदविले आहे. 

लॉकडाऊनच्या काळात २२ हजार कोटी रूपये देशभरातील शेतकऱ्यांना वितरित केल्याचेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर इतर अनेक महत्वाच्या घोषणाही केल्यात.

Team Lokshahi News