Categories: अध्यात्म पर्यटन

आषाढीवारी निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर।४ जुलै।आषाढीवारीच्या निमित्ताने आज पासुन विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे. या दरम्यान यजमान पूजा आणि राजोपचार बंद राहणार आहेत. आषाढीवारी काळात जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता यावे यासाठी प्रक्षाळ पूजे पर्यंत विठ्ठल मंदिर दरवर्षीप्रमाणे यंदाही २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची  पूजा करून देवाचा पलंग काढला जाणार आहे. त्यानंतर दर्शन सुरू राहणार आहे. 

आषाढीवारी निमित्त पंढरपूरात जगभरातून वारकऱ्यांचा मेळा भरतो, दिंड्या, पताका घेऊन वारीत पायी चालत आल्यानंतर आलेल्या भाविकांना वेळेत दर्शन मिळणे अपेक्षित असते. परंतु बऱ्याचदा यात अडथळे आल्याने भाविकांना दर्शन रांगेत ताळकटत बसावे लागते. भाविकांची होणारी ही गैरसोय ध्यानात घेऊन आषाढीवारीच्या काळात विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिवसेंदिवस पंढरपूरात आषाढीवारीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढू लागलीय. त्यामुळे प्रशासन देखील वाढत्या भाविकांच्या सोईसाठी जास्तीत जास्त सुलभता आणण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. विशेष म्हणजे सध्या पंढरपूरात भारतीयांबरोबर परदेशी भक्तांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. 

Rajendra Hankare

Share
Published by
Rajendra Hankare
Tags: vithal_rukmini