Categories: क्रीडा महिला शिक्षण/करिअर

३ वर्षापूर्वीची ‘ही’ साधीभोळी पोरगी.. आज आहे देशातली टॉप ‘बाईकरायडर’ तिच्यातला हा बदल नक्की वाचा…

कोल्हापूर।१५ जुलै। ‘गायत्री पटेल’ ३ वर्षांपूर्वी एक विनम्र, सरळ साधी व कुटुंबांशिवाय कोणत्याही उपक्रमात सहभागी न होणारी मुलगी आज भारतासह जग पालथा घालण्याची जिद्द ठेवतेय… आत्तापर्यंत बराचसा भारत तिने बाईक रायडिंग करत पालथाही घातला आहे… हो हे खरं आहे…वाचून विश्वास बसत नाही ना… ठीक आहे… चला तर वाचा मग खुद्द गायत्रीच्याच शब्दात तीचा हा प्रवास…

Gayatri Patel – ३ वर्षांपूर्वी मी एक विनम्र, सरळ साधी व माझ्या कुटुंबांशिवाय कोणत्याही उपक्रमात सहभागी न होणारी मुलगी होते. मी एकटी कोणत्याही अज्ञात स्थळी जाण्यास घाबरत होते, एक मुलगी म्हणून माझ्या समोर सामाजिक बंधनाचे अडथळे होते. एके दिवशी मी गोव्याकडे जाणारा एक बाईक रायडर्स चा समुह पाहिला… आणि त्या क्षणी… जवळजवळ तात्काळ माझ्या मनात एक कुतुहल निर्माण झाले. बाईक रायडिंग बद्दल असणाऱ्या उपजत आवडीला व भावनेला चालना मिळाली.

मला माहित होते की ‘बाईक राइडिंग’ ही एक सोपी यात्रा नाही आणि निश्चितच नव्हती! सुरुवातीला मला खूप टीका व नापसंतीचा सामना करावा लागला. मला जे पाहिजे होते त्यासाठी संघर्ष आणि समाजाविरुद्ध जावे लागले. पण आता मी, तेव्हापासूनच्या अडथळ्यांच्या मार्गावरुन माझ्या इच्छित ध्येयापर्यंत पोहचले आहे.

केवळ मनोरंजन साधनापेक्षा ‘बाईक राइडिंग’ माझ्यासाठी बरेच काही आहे. त्यामुळे मला माझी क्षमता शोधण्याची आणि माझ्या मर्यादांची चाचणी घेण्याची संधी मिळाली. खरोखर मी बाईकिंगमुळे बरेच काही शिकले, अनुभव घेतले! बाईक राडिंग आता माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. 

पुर्वीचे दिवस पाहता, मी विश्वास ठेवू शकत नाही की ही तीच गायत्री पटेल आहे..? इतका अविश्वसनिय बदल बाईक रायडिंगमुळे माझ्यात झाला आहे. हा एक माझ्या ध्येयपुर्तीचा प्रवास होता! म्हणूनच माझ्यासाठी तो एक भावनिक आणि अभिमानास्पद क्षण आहे. 

जेव्हा माझे नाव “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स” मध्ये अंदमान आणि निकोबार बाईक वरुन प्रवास करणारी पहिली महिला (रायडर विशाखासह) म्हणून संबोधीत केले गेले. मला जेव्हा हे प्रमाणपत्र मिळाले तो माझ्या आयुष्यातील एक सुवर्णदिन आहे.

गायत्री पटेल.. बाईक रायडर्सचा ग्रुप बघून प्रभावित झालेली ही कोल्हापूरची पोरं.. भावाची दुचाकी शिकून सुरू झालेला तिचा प्रवास आता भारताच्या सिमा ओलांडून गेलाय. २०१५ साली सुरू झालेला तिचा हा प्रवास आज तिला वेगळी ओळख मिळवून देणारा ठरतोय… देशातील टॉप बाईकर्समध्ये गणली गेलेली ही कोल्हापूरची पोरं.. तीन वर्षापूर्वी एक विनम्र, सरळ साधी व कुटुंबांशिवाय कोणत्याही उपक्रमात सहभागी न होणारी मुलगी होती. परंतु तिच्यात झालेला हा बदल सर्वच महिला व तरूणींना प्रेरणा देणारा आहे…
मिळवलेले टायटल :
 • नॅशनल contest पहिली महिला TRUE WANDERER title मिळवलं 2018.
 • रॉयल एनफिल्ड रायडर मेनिया 2018 dirt race winner 3rd Goa.
 • Apache Girl Rider – GP
आज पर्यंत केलेल्या राईड :
 • कोल्हापूर कन्याकुमारी कोल्हापूर २०१७
 • कोल्हापूर लेहलदाख स्पिती व्हॅली कोल्हापूर २०१७
 • कोल्हापूर भुतान कोल्हापूर २०१८
 • राजस्थान कोल्हापूर २०१८
 • दिल्ली लेह लदाख कोल्हापूर २०१८
 • कोल्हापूर अंदमान कोल्हापूर २०१९
 • सिक्किम २०१९
 • स्पिती व्हॅली २०१९

Thanks Mom n Dad for everything…

एक कोल्हापूरकर, रायडर GP (Gayatri Patel) Insta handle @rider_GP23

Rajendra Hankare

Share
Published by
Rajendra Hankare
Tags: Gayatri Patel GP Kolhapuri Bike Rider कोल्हापूर बाईक रायडर