Categories: Featured कृषी

मधमाशी पालनासाठी ५०० कोटी, २ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नवी दिल्ली। केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने मधमाशीपालनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलाय. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत यासाठी ५०० कोटी रूपयांची घोषणा केंद्र सरकारच्यावतीने नुकतीच करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत योजनेच्या तिसऱ्या पॅकेजच्या संदर्भात सविस्तर माहिती देताना अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी याविषयी माहिती दिलीय. 

मधमाशीपालन योजनेच्या या ५०० कोटी रूपयांचा लाभ देशातील २ लाख शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. एकीकृत मधमाशी पालन विकास केंद्र, विपणन आणि साठवण केंद्र, पोस्ट हार्वेस्ट आणि मुल्यवर्धन सुविधा यासारख्या बाबींवर यामध्ये भऱ दिला जाणार आहे. यामध्ये महिला शेतकरीवर्गाचा अधिकाधिक समावेश करून घेतला जाणार आहे. यामुळे मधाचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारून उत्पन्नात वाढ होईल अशी आशा सरकारला आहे. 

सध्या देश मोठ्या संकटातून जात असून केंद्रसरकारने शेतकरी तसेच सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. त्यांची योग्यरित्या अंमलबजावणी झाल्यास देशातील शेतकरी आणि सर्वसामान्यांना त्याचा चांगला फायदा होणार आहे. 

Rajendra Hankare

Share
Published by
Rajendra Hankare
Tags: beekeeping beekeeping equipment beekeeping in india beekeeping slideshare beekeeping supplies beekeeping videos honey bee farming box honey bee farming in gujarat honey bee farming in hindi honey bee farming in kerala honey bee farming in maharashtra honey bee farming in tamilnadu honey bee farming in telugu honey bee farming profit in india honey beekeeping honey farming how to start beekeeping importance of beekeeping भारतात मधमाशी पाळणे मध उद्योग मराठी मधमाशी पालन मधमाशी पालन उपकरणे मधमाशी पालन करणारे व्हिडिओ मधमाशी पालन कसे सुरू करावे मधमाशी पालन पुरवठा मधमाशी पालन पेटी मधमाशी पालन स्लाइडशेअर मधमाशी माहिती मराठी मधमाशीपालन अनुदान मधमाश्या पाळण्याचे महत्त्व मधुमक्षिका पालन केंद्र पुणे मधुमक्षिका पालन केंद्र महाबळेश्वर