Categories: गुन्हे बातम्या

धक्कादायक : मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी करण्यासाठी सोशल मिडीयावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंट्स

मुंबई | सुशात सिंग आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी ८० हजार पेक्षा अधिक फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशावर सायबर सेलने आयटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन अधिक चौकशी सुरु केली आहे. याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे.

अभिनेता सुशांत सिंहचा मृतदेह १४ जून रोजी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर सुशांतची आत्महत्या नसून हत्या झाल्याच्या चर्चा होऊ लागल्या. बरेच दिवस सोशल मीडियावर सुशांतबद्दल हॅशटॅगही टॉप ट्रेण्डमध्ये होता. यावर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने चौकशी केली असता हे सर्व फेक अकाऊंट्सच्या माध्यमातून सुरु असल्याचे समोर आले आहे.

परदेशातून चालवले जातात फेक अकाऊंट्स
“सर्वाधिक फेक अकाऊंट्सचा प्रॉक्सी सर्व्हर हा परदेशातील आहे. सायबर सेलच्या अहवालात समजले की, मुंबई पोलिसांच्या विरोधात केलेल्या पोस्ट इटली, जपान, पोलँड, स्लोवेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलँड, रोमानियासारख्या इतर देशातून केल्या आहेत”. या फेक अकाऊंटची संख्या हजारोमध्ये असू शकते. आम्ही सध्या हे संबंधित आकडे एकत्र करत आहे. या फेक अकाऊंट्सच्या माध्यामातून गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. आम्हाला याबद्दलची सूचना मिळाली होती. त्यानंतर सायबर सेलला चौकशी करण्याचे आदेश दिले होते”, असंही आयुक्तांनी सांगितले.

सायबर सेलने केलेल्या चौकशीत, हजारोंच्या संख्येत फेक अकाऊंट्स तयार करुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे समोर आले. या अकाऊंटवरून पोलीस आयुक्तांवर आक्षेपार्ह कॉमेंट्स आणि त्यांना ट्रोल केले गेले. यासाठी इन्स्टाग्रामपासून इतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला गेला. प्रत्येक आक्षेपार्ह पोस्ट आणि कॉमेंट्समध्ये मुंबई पोलीस आणि सुशांत सिंह राजपूतच्या हॅशटॅगचा वापर केला गेला, अशी माहितीही सायबर सेलच्या चौकशीतून समोर आली आहे. या प्रकरणात आयटी अॅक्ट सेक्शन ६७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी २ सप्टेंबरला एका संशयितावर गुन्हा दाखल केला होता. त्याने ट्विटरवर पोलीस आयुक्तांचा मॉर्फ फोटो तयार केला होता”, असे डीसीपी रश्मी यांनी सांगितले.

या हॅशटॅगचा सर्वाधिक वापर 
सोशल मिडीयावरून महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्यासाठी ट्वीटर, इन्स्टाग्राम आणि फेसबूकसह इतर मीडिया प्लॅटफॉर्मवर #JusticeForSSR and #SushantConspiracyExposed #justiceforsushant #sushantsinghrajput आणि #SSR चा वापर केलेला आहे, दरम्यान, पोलिसांनी ज्या फेक अकाऊंट्सच्या विरोधात आयटी अॅक्टद्वारे गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ५ वर्षापर्यंत जेल आणि ५ ते १० लाख रुपयापर्यंतचा दंड आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: mumbai police commissioner Sushant singh rajput Sushant Singh Rajput suicide