Categories: Featured

मुंबईकर मराठी तरूणाची राज ठाकरेंना कळकळीची विनंती, सोशल मिडीयावर व्हायरल

राज ठाकरे यांना कळकळीची विनंती आहे कि कोणत्याही परिस्थितीत भाजप च्या नादाला लागू नये. तुमच्या बद्दल असलेला आदर काल होता आणि आजही आहे, पण मागच्या एक-दीड महिन्यात भाजपच्या नेत्यांना भेटून तुमची जी विचारसरणी बदलली आहे आणि आता मनसेच्या नेत्यांची वक्तव्य पाहता तुमचा रोख खरा शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे असे काही पाऊल उचलू नका कि तुमच्याबद्दल असलेला आदर कमी होईल. 

कशासाठी चाललय हे सगळ. मुंबई मिळवण्यासाठी मराठी माणसाने रक्त सांडले हे तुम्हाला सांगायला नको. तुम्ही हे आमच्याहून चांगले जाणता आहात. मुंबईत आधीच मराठी टक्का हळूहळू कमी होत चालला आहे आणि परप्रांतीयांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. भाजपला मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत हवी आहे म्हणूनच या कपटी भाजपने तुम्हाला पुढे केले आहे.

तुमचा भाऊ आज मुख्यमंत्री पदावर विराजमान आहे.त् यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहायचे सोडून त्यांच खच्चीकरण करण्याचे प्रयत्न चालू आहे आणि हे काम तुमच्या माध्यमातून भाजप करत आहे हे तुम्हांला कळत नाही असं तर कधी होणारच नाही. याच भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी तुम्ही विरोधी पक्षांनी एक व्हावे यासाठी प्रयत्न केले होते, ‘लाव रे तो व्हिडिओ’ च्या माध्यमातून तुम्ही भाजपला सळो कि पळो करून सोडले होते, तेव्हा ज्येष्ठ शिवसैनिकांपासून ते सामान्य मराठी माणसांनी तुमची वाहवा केली होती तसेच तुम्ही अनेकदा तुमच्या भाषणातून सांगत होता कि शिवसेनेने भाजपशी युती तोडावी मग आता युती तोडली आहे तर मग मागच्या २ महिन्यात अस काय घडले कि तुम्ही भाजपच्या नादी लागला आहात. भाजप च्या नेत्यांना भेटत आहात. 

महाराष्ट्रात ठाकरेंशिवाय भाजपची डाळ शिजणार नाही हे भाजपला माहित आहे म्हणूनच आता सेनेचे खच्चीकरण करायचे असेल तर राज ठाकरे हवेच म्हणूनच आता तुम्हाला पुढे केले जात आहे. भाजपचा मराठी द्वेष तुम्हाला माहित आहे, पण आता त्याच भाजपच्या नादाला लागून तुम्ही आणि तुमचे नेते ज्या पद्धतीने शिवसेनेवर आसूड ओढत आहे त्यातून भाजपला हवं असलेले ध्येय साध्य होत आहे.

भाजपला आता एकच हवं आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिका. ती हवी असल्यास सेनेची मत फोडणे. मराठी माणसांने एकमेकांमध्ये भांडून एकमेकांची डोकी फोडणे हेच हवं आहे आणि ते साध्य झाले तर मुंबई महानगरपालिका आपल्या हातात येईलं अस सगळं गणित आहे. एकदा का मुंबई महानगरपालिका भाजपच्या हातात गेली कि मुंबईतील मराठी माणूस हा कायमचा उठून गेलाच म्हणून समजा. 

पुन्हा एकदा तुम्हाला कळकळीची विनंती आहे कि भाजपच्या नादी लागू नका. मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसांच्या भावना काय आहेत या पहिल्या समजून घ्या. शिवसेना आणि मनसे ने एकत्र यावे यासाठी ज्येष्ठ शिवसैनिकांपासून ते अनेक मराठी प्रेमी संघटनांनी खूप प्रयत्न केले आणि आजही करत आहेत. त्यामुळे अस काही करू नका कि सेना-मनसे त अजून ठिणगी पडेल आणि त्याचा फायदा भाजपला होईल. तडीपार शहा दिल्लीत त्याचीच वाट बघत आहे. 

  • सुरेंद्र भद्रिके, एक सामान्य मुंबईकर
Team Lokshahi News