मुंबई | बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच भारतात नोकऱ्यांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जगभरातल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या आता भारतात जवळपास 1.80 ते दोन लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहेत. अमेक्स, बँक ऑफ अमेरिका, मॉर्गन स्टॅनले यासारख्या अनेक कंपन्यांनी भारतात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला. लसीकरणानंतर ही परिस्थिती आता बदलली आहे. बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम बंद करुन आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येण्यास सांगितलं आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये या कंपन्यांमध्ये नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली नव्हती. आता मात्र या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची भरती करण्याची तयारी सुरू केली आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, भारतात फर्म असलेल्या मल्टीनॅशनल कंपन्या अर्थात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आता भारतात 1.80 लाख ते दोन लाख नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्याची तयारी सुरू केली आहे.

  1. Amex
  2. Bank of America
  3. Wells Fargo
  4. City, Barclays
  5. Morgan Stanley
  6. HSBC
  7. Standard Chartered
  8. Goldman Sachs
  9. Amazon
  10. Target
  11. Walmart
  12. Shell
  13. GSK
  14. Abbott
  15. Pfizer
  16. AstraZeneca