मुंबई। सोशल मिडीयावर कियारा अडवानीचा एक फोटो भलताच धुमाकुळ घालतं असल्याचे पहायला मिळत आहे.बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी याने दरवर्षीप्रमाणे त्याच्या नवीन सेलिब्रिटी कॅलेंडरसाठी कियाराचे फोटोशूट केले आहे. अनेक कलाकार या कॅलेंडर साठी फोटोशूट करून घेतात. या कॅलेंडरमधील अभिनेत्री कियारा अडवानीच्या फोटोची सध्या चांगलीच चर्चा असून तिचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. कियाराने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केलं आहे. हा फोटो कियाराने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या फोटोला तब्बल १८ लाख ८१ हजार लोकांनी लाईक केले आहे. प्रत्येक मिनिटाला यात हजारो लाईकची भर पडत आहे. सध्या कियाराचे इंस्टाग्रामवर १ कोटी पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.