Categories: Featured

आमदार ऋतुराज यांच्यासाठी आदित्य ठाकरेंच ‘हे’ खास ट्विट..!

मुंबई | कोल्हापूर दक्षिणचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोना झाल्याचे कळताच ठाकरे सरकारमधील युवा मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. ठाकरेंनी ट्विटरवरून पाटील यांना काळजी घेण्यास सांगितले आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये “स्वतःची काळजी घ्या @ruturajdyp जी! कोरोनाविरूद्ध लढ्यात आपण जनतेच्या हितासाठी खूप चांगले कार्य केले आहे. मला विश्वास आहे की आपण लवकरच बरे होऊन पुन्हा नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. आपण लवकरात लवकर बरे व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना! असे म्हणटले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता लोकप्रतिनिधीना देखील कोरोनाची बाधा होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाची आणखी धावपळ वाढली आहे. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोना झाल्याची माहिती त्यांनी आज सकाळी स्वतःच आपल्या ट्विटर हॅंडलवरून दिली आहे. त्यामुळे ऋतुराज पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काळजीची भावना उमटली आहे.

Team Lokshahi News