Categories: आरोग्य सामाजिक

Corona Effect: कोल्हापूरातील ‘त्या’ दोन रूग्णांच्या मृत्युबाबत प्रशासनाचा खुलासा

कोल्हापूर। कदमवाडी येथील ८५ वर्षांच्या महिलेचा कोरोना बाबतचा अहवाल अद्याप अप्राप्त असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पी पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटल मध्ये २६ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजता या महिलेस उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा गंभीर त्रास, तसेच रक्तदाब व तीव्र अडथळा आणणारा फुफ्फुसाचा रोग (सी. ओ. पी. डी.) निष्पण झाला. तसेच त्यांना यापूर्वीच रक्तदाब असल्याने त्या उपचार घेत होत्या. त्यांचा बाधित देशात, शहरात प्रवास झालेला नव्हता तसेच कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क झाल्याचा इतिहास नव्हता. रुग्णाचे वय विचारात घेवून तसेच सध्याची कोरोना साथ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. त्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. हा रुग्ण गंभीर असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज सकाळी ७.१५ वा. त्यांचा मृत्यू झाला.

हातकणंगले येथील ३७ वर्षाच्या तरुणाचा  कोरोना बाबतचा अहवाल अद्याप अप्राप्त असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. येथील सी. पी. आर हॉस्पीटल मध्ये ३१ मार्च रोजी पहाटे २.३० वाजता या तरुणास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यास श्वसनाचा गंभीर त्रास, तसेच निमोनिया व सेपसिस निष्पण झाला. त्यांचा बाधित देशात, शहरात  प्रवास झालेला नव्हता तसेच कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाशी संपर्क झाल्याचा इतिहास नव्हता. तरीही सध्याची कोरोना साथ लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्याचा स्वॅब नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. हा रुग्ण गंभीर असल्याने त्याच्यावर उपचार सुरु असताना आज सकाळी ११.३० वा त्याचा मृत्यू झाला.

Team Lokshahi News