कोल्हापूर | मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाजातील तरूणांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणारे, नोकरीसाठी अर्ज करणारे असे सर्वच वयोगटातील तरूण यामुळे नैराश्येत असून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मराठा समाजावर ही वेळ आली असून, नुकतीच बीड जिल्ह्यातील विवेक राहाडे (वय १८) या तरूणाने आत्महत्या केली आहे. यामुळे भावनिक झालेल्या खासदार संभाजीराजे यांनी ट्विटवरून एक पोस्ट शेअर केली असून मराठा आरक्षण लढाईतील प्रत्येक मावळा लाखमोलाचा आहे. यामुळे कोणीही असा पर्याय निवडू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.