मुंबई | केंद्राच्या नवीन लष्करी भरती योजना ‘अग्निपथ’ (Agnipath) साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ते देशभरात होत असलेल्या कोणत्याही हिंसक निदर्शने किंवा जाळपोळीच्या घटनांमध्ये सहभागी नव्हते असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.

रविवारी लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना, लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव, लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले, सर्व अग्निवीरांना प्रतिज्ञापत्र देऊन हे स्पष्ट करावे लागेल की त्यांनी कधीच अशा कोणत्याही हिंसक निदर्शनात किंवा जाळपोळीच्या घटनांमध्ये सहभाग घेतला नाही. ते म्हणाले, शिस्त ही सशस्त्र दलांची मूलभूत गरज आहे. कोणत्याही उमेदवाराविरुद्ध एफआयआर असल्यास ते त्यात सहभागी होऊ शकत नाहीत.

अग्निपथ योजनेबाबत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज तिन्ही लष्करप्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नाही. मात्र त्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेबाबत आज दोन दिवसांत दुसऱ्यांदा लष्करी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक घेऊन या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये, डीएमएचे अतिरिक्त सचिव, लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी केंद्राच्या योजनेची संपूर्ण माहिती दिली. यावेळी त्यांनी ही योजना त्यांच्यासाठी फायदेशीर आहे हे तरुणांना समजावून सांगितले पाहिजे यावर भर दिली.

या पत्रकार परिषदेत डीएमएचे अतिरिक्त सचिव, लेफ्टनंट जनरल अनिल पुरी म्हणाले की, भारतीय सैन्यात 30 वर्षे वयाचे सैनिक मोठ्या संख्येने आहेत. लष्करातील जवानांचे वय चिंताजनक आहे. अशा स्थितीत लष्कराला जोश आणि होश या दोन्हींची जोड हवी आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.