ajit pawar
पुणे | कृषि विधेयकावरून देशभरातील शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात ही विधेयके लागू करणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी कृषि विधेयकाबाबत ही घोषणा केली आहे.
पुण्यात कृषि विधेयकाबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला होता. यावेळी पवार यांनी, आपल्या राज्याचा विचार करायचा झाल्यास, महाराष्ट्रात हे विधेयक मंजूर करणार नाही. मात्र त्यापूर्वी तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याची भूमिका मांडली आहे.
कृषि विधेयकावरून देशभरातील शेतकऱ्यांमध्ये विरोध वाढत असताना महाराष्ट्रात घेण्यात आलेला निर्णय महत्वाचा मानला जात आहे.