मुंबई | भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेना अग्निवीर भरती नोटिफिकेशन भारतीय वायुसेनेने प्रसिद्ध केले आहे. भारतीय नौदलाकडून २५ जून रोजी नोटिफिकेशन जाहीर केली जाईल. हवाई दलात २४ जून, नौदलात २५ जून आणि लष्करात १ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरु होईल. 

पदांचे नाव:- 

 • Agniveer General Duty
 • Agniveer Tantric (Aviation / Ammunition)
 • Firefighter Clerk / Storekeeper Technical
 • Agniveer Tradesman 10th pass
 • Agniveer Tradesman 8th pass

अग्निपथ योजनेंतर्गत संरक्षण दलात चार वर्षांसाठी अग्निवीर म्हणून तात्पुरत्या भरतीसाठी देशव्यापी विरोध सुरु आहे. तर दुसरीकडे लष्कराकडून भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करून अर्ज मागविले जात असून तारखा जाहीर झाल्या आहेत. इंडियन आर्मी अग्निवीर भरती अधिसूचना २०२२ आणि भारतीय हवाई दल अग्निवीर भरती अधिसूचना २०२२ जारी करण्यात आली आहे. भारतीय नौदलाकडून २५ जून रोजी अग्निवीर भरती २०२२ नोटिफिकेशन जाहीर केले जाणार आहे.

 • दुसरीकडे, नौसेना अग्निवीर अधिकृत वेबसाइट, joinindiannavy.gov.in वर भरतीसाठी अर्ज करु शकतात.
 • आर्मी अग्निवीरची वेगवेगळ्या ट्रेडमध्ये भरती केली जाईल.
 • त्यानुसार आवश्यक पात्रता देखील भिन्न आहेत.
 • ट्रेड्समनसाठी आठवी किंवा दहावी उत्तीर्ण, सामान्य ड्युटीसाठी दहावी उत्तीर्ण आणि तांत्रिक, स्टोअर कीपर आणि लिपिकासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • याशिवाय उमेदवारांचे वय १७ वर्षे ५ महिने ते २३ वर्षांदरम्यान असावे.
 • या वर्षासाठी कमाल वयोमर्यादा २३ वर्षे ठेवण्यात आली आहे, तर योजनेतील कमाल वयोमर्यादा २१ वर्षे इतकी आहे.

वायुसेना अग्निवीर भरती नोटिफिकेशन – https://bit.ly/3OapxTW 

Indian Air Force Agniveer Recruitment 2022 Application Link – careerairforce.nic.in 

Terms and Conditions – https://bit.ly/3xCEwPv

 • अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी ३० हजार रुपये पगार आणि भत्ते,
 • दुसऱ्या वर्षी ३३ हजार रुपये पगार आणि भत्ते,
 • तिसऱ्या वर्षी ३६,५०० रुपये पगार आणि भत्ते आणि
 • चौथ्या वर्षी ४०,००० हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
 • चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.
 • दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चार वर्षांनंतर बारावी समकक्ष प्रमाणपत्र देखील मिळेल.