Categories: Featured

बाकीच्या मंत्र्यांनी फक्त घोषणा केल्या; अजितदादांनी मात्र ‘हे’ करून दाखवलं!

मुंबई | राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी सुरु केलेल्या सारथी संस्थेसाठी ८ कोटी रुपयांची मदत जाहीर केलीय. तसंचसारथी संस्था बंद होणार नाही. कुणीही अफवा पसरवू नका असेही स्पष्ट केले आहेसारथीच्या बैठकीत बसण्यावरुन मराठा समाज समन्वयकांसोबतच्या वादानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या दालनात बोलावून बैठक घेतली. यावेळी अजित पवार यांनी संभाजीराजे यांना आपल्यासोबत समोर मंचावर बसवले. या बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, सचिन सावंत हे देखील उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले, सारथीचं कामनियोजन विभागाच्या अखत्यारित घेतलं जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाईल. अण्णासाहेब पाटील महामंडळ हे नियोजन खात्याच्या अख्यारित घेणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं. सारथी वर उत्तर शोधायचं की फाटे फोडायचे? मला सारथीवर मार्ग काढायचा आहे, यासाठी मी माझं सर्वस्व ही पणाला लावणार असून दर दोन महिन्यांनी याचा पाठपुरावा घेणार, असं अजित पवार म्हणाले. मराठाओबीसी असा वाद भासवण्याचा प्रयत्नकेला जात आहे, मात्र असा कोणताही विषय नाही, संभाजीराजेंच्या ट्विटनंतर मी स्वतः विजय वडेट्टीवारांशी बोललो, असंही अजित पवारांनी स्पष्ट केले.

सारथीच्या बैठकीत झालेल्या वादानंतर संभाजीराजे यांनी देखील माध्यमांकडे आपली प्रतिक्रिया दिली असून, मराठा समाजानं गैरअर्थ घेऊ नये. काही निर्णय घ्यायचे होते म्हणून अजित दादांनी दालनात बैठक घेतली. या संस्थेची स्वाययत्ता कायम राहिली पाहिजे. सारथी टिकवायची आहे, स्वायत्तता टिकवायची आहे, पवार साहेबांनी निर्णय घेतलेत, कुणी गोंधळ आणि गैरसमज करुन घेऊ नये, पूर्वीच्या सचिवांनी संस्थेची स्वायत्तता मोडीत काढली, पवारांनी शब्द दिलाय, सारथीची स्वायत्तता टिकेल, त्याची जबाबदारी त्यांनी स्वत:कडे घेतलीय असे सांगितले. 

सारथी ही शाहू महाराजांच्या नावाने सुरु असलेली संस्था आहे, ती बंद होणार नाही, आण्णासाहेब पाटील महामंडळाचं काम आणि सारथीचं काम आता एकाच छताखाली सुरु होईल, सारथी टिकवण्यासाठी इथं आलोय, सारथीची जबाबदारी अजित पवारांनी घेतली आहे, पवारांनी शब्द दिला आहे, असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केले. 

Team Lokshahi News