Categories: राजकीय

मोर्चे काढणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत दातखिळ बसते… अजितदादांची शिवसेनेवर घणाघाती टिका

पिंपरी।१८ जुलै। मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांची दातखिळ बसते, आणि बाहेर मोर्चे काढून हे जनतेला मूर्ख बनवतात अशी घणाघाती टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. पिंपरी चिंचवडमध्ये विधानसभा निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी पवारांनी शिवसेनेवर हा घणाघात केला आहे. 

यावेळी पवार यांनी,शिवसेनेने पीक विम्या संदर्भात मोर्चा काढून जनतेला मूर्ख बनवण्याचे काम केल्याचे सांगितले. सत्तेत आहात मग मोर्चा काढण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्याला बोलावून पीक विमा द्यायला हवा होता. मोर्चा काढून काय केलं तर सरकारला पंधरा दिवसांची मुदत दिली, मग ही मुदत तर पत्रकार परिषद घेऊन ही देता आली असती. बरं मोर्चा काढायचाच होता तर अधिवेशन सुरू असताना का काढला नाही. असा प्रश्नही यावेळी पवारांनी उपस्थित केला.

दरम्यान पवार यांनी, महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणूका बॅलेट पेपरवर घेऊन, ईव्हीएम बद्दलच्या शंका-कुशंका संपवाव्यात अशी मागणी केली आहे. हे मत इतर पक्षांचेही असल्याची पुष्टी त्यांनी यावेळी जोडली. 

Rajendra Hankare