Categories: कला/संस्कृती व्हायरल

गुगलच्या डूडलवर मोगॅंबोची हवा, गुगलची अमरिशपुरी यांना अनोखी मानवंदना

मुंबई।२२जून। गुगलच्या डूडलवर आज मोगॅंबो अर्थात बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्हिलन आणि दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांची हवा पहायला मिळत आहे. गुगलने अमरिशपुरी यांचे खास डुडल बनवून त्यांना मानवंदना दिली आहे. अमरीश पुरी यांची आज ८६ वी जयंती आहे. या निमित्ताने गुगलने त्यांचे डुडल तयार केले आहे. त्यांचे हे डुडल सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अमरिश पुरी यांनी मोठ्या पडद्यावर नेहमीच वैविध्यपूर्ण आणि विविधरंगी भूमिका साकारल्या. त्यांचा खलनायकी अंदाज प्रेक्षकांना जास्त भावला. मोगॅम्बो खुश हुऑं! हा डायलॉग आजही अनेकांच्या तोंडी असलेला त्यांचा सर्वात प्रसिद्द डायलॉग आहे. 

अमरीश पुरी यांचा जन्म २२जून १९३२ रोजी लाहोर येथे झाला होता. सुरुवातीच्या काळात त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. १९८० साली आलेल्या हम पाँच या चित्रपटामुळे ते प्रकाशझोतात आले होते. यानंतर त्यांची बॉलिवूडमधील कारकिर्द सुरू झाली. अमरीश पुरी यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिकांमुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले.  नायक सिनेमातला मुख्यमंत्री या त्यांच्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून चांगलेच कौतूक झाले.

अमरिशपुरी यांनी त्यांचा पहाडी आवाज आवाजाच्या माध्यमातून आणि अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ४०० पेक्षा अधिक चित्रपटात काम केले. १२ जानेवारी २००५ रोजी अमरीश पुरी यांचे कर्करोगाने निधन झाले होते. आज त्यांच्या जन्मदिनी गुगलने त्यांना मानवंदना म्हणून बनवलेले डूडल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 

By Lokshahi.News

आपल्या परिसरातील बातमीयोग्य माहिती आम्हास ८२७५२७२२४१ या व्हॉटस्अप नंबरवर शेअर करा, अथवा elokshahi.news@gmail.com या मेल आयडीवर पाठवा. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: amrish puri amrishpuri_googel_doodel