Categories: राजकीय

विधानपरिषदेच्या निकालानंतर अमृता फडणवीस यांचे ट्विट; म्हणाल्या…

मुंबई | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात रंगलेला सामना महाविकास आघाडीने जिंकला आहे. दरम्यान, भाजपचा पुणे आणि नागपूरमध्ये पराभव झाला असून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या वाट्याला यश आले आहे. यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र एक ट्विट करत, ‘वाईट सुरुवात झाली त्याचा शेवट चांगलाच होतो..’ असे म्हणटले आहे.

दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी आपली हार मानत पराभवाला शिवसेनेला जबाबदार धरून टार्गेट केले आहे. आमची एक जागा आली त्यांची एकही जागा आली नाही. शिवसेनेला आत्मचिंतन करणे आवश्यक आहे असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकटे लढून दाखवा असे आव्हान महाविकास आघाडीला दिले आहे. 

Team Lokshahi News