मुंबई | यंदाच्या वर्षी शेतकरी वर्गावरील संकटे कमी होताना दिसत नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याना दिलासा देण्यासाठी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महत्वाची घोषणा केली आहे. येत्या रब्बी हंगामात कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा करण्याची ग्वाही उर्जामंत्र्यानी दिली आहे.
राज्याचे वीजक्षेत्र सध्या प्रतिकूल परिस्थितीत काम करीत आहे. तरीही वीजपुरवठा सुरळीत ठेवून ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही याबाबत कायम दक्षता घ्यावी, असं आवाहनही नितीन राऊत यांनी केलं आहे.
मुंबई येथील प्रकाशगडला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान प्रकाशगड येथे आयोजित बैठकीत परतीच्या पावसामुळे राज्याच्या काही भागात झालेल्या वीजयंत्रणेच्या नुकसानीचा आढावा तसेच राज्यभरातील वीजपुरवठ्याची स्थिती तसेच इतर विविध मुद्द्यांवर बैठक घेतली.