Categories: Featured व्हायरल सामाजिक

पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांची ‘ही’ “महत्वाची सूचना…” सोशल मिडीयावर व्हायरल

कोल्हापूर। एक महत्वाची सूचना या नावाने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबाबतची पोस्ट समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली आहे.सध्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाने सगळीकडेच जोर धरलाय. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत भर पडत आहे. कोरोनाबाधित आणि संशयितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना शोधून क्वारंटाईऩ करेपर्यंत प्रशासनाची खूप दमछाक होत आहे. हे टाळण्यासाठी आणि जे संपर्कात आले आहेत, त्यांची लवकरात लवकर माहिती मिळावी या उद्देशाने डॉ. अभिनव देशमुख यांनी ही संकल्पना समोर आणलीय.

स्टेहोम, सेव्हलाईव्हज्अशी सुरुवात असणाऱ्या या पोस्टमध्ये प्रत्येकाने काही दिवसांकरिता एक छोटी वही आपल्यासोबत बाळगावी. त्या वहीत आपण दिवसभरात ज्यांच्या-ज्यांच्या संपर्कात आलो त्यांची नावे, कोठे कोठे गेलो त्याची नोंद दिनांकासहित प्रत्येक पानावर लिहा. जेणे करुन जरी आपल्याला कोरोना संसर्ग झालाच, तर प्रशासनाला आपल्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती मिळविण्यास मदत होईल. यालाच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणतात. ‘‘आपल्या या छोट्याशा सवयीने कित्येकांचं आयुष्य वाचवलं जावू शकते’’ कोरोना व्हायरस  थांबवा घरात राहून! आपले आरोग्य जपा सहकार्य करा, असा संदेश दिला आहे.

आमची वर्दी कोरोना प्रतिरोधक नाही, कृपया नियमांचे पालन करा. संपर्कासाठी व्हाटस्ॲप 7218038585 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी केले आहे.

Rajendra Hankare