Categories: राजकीय

…आणि कपिल सिब्बल यांनी राहूल गांधींविरोधातील ‘हे’ ट्विट अवघ्या काहीवेळातच केले डिलीट!

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्षपदावरुन काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू असताना, राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त करत ट्विट करणाऱ्या कपिल सिब्बल यांनी अवघ्या काही मिनिटातच आपले ट्विट मागे घेतले आहे. 

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवर भाजपसोबत हातमिळवणीचे आरोप लावल्याचे म्हणटले जात होते. यावरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद राहुल गांधीवर नाराज झाले होते. बैठकीदरम्यान ट्विट करत कपिल सिब्बल यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली होती. मात्र, काहीवेळातच त्यांनी आपले ट्विट मागे घेतले आहे.
कपिल सिब्बल यांनी आपले ट्विट मागे घेताना स्पष्ट केले आहे की, राहुल गांधी यांनी कळविले की, त्यांनी अस मत व्यक्तच केलं नाही, त्यामुळे मी माझे ट्विट मागे घेतो.

Team Lokshahi News