Categories: राजकीय

..आणि मंत्री मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांसाठी चंद्रकांत पाटलांना दिलं ‘हे’ खुलं आव्हान!

कोल्हापूर | राज्याचे ग्रामविकास व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज केलेल्या राज्यव्यापी आंदोलनावर टीका करताना मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना ‘एक’ खुलं आव्हानही दिलय. यावरून येत्या काळात या दोघांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता दिसू लागलीय.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच त्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाचा फज्जा उडाल्याची टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलीय. यावेळी मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष या नात्याने कोल्हापूर जिल्ह्यातील एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहिल्यास मी कोणतीही शिक्षा भोगीन, असं खुलं आव्हान चंद्रकांत पाटील यांना दिलयं. चंद्रकात पाटील यांनी कर्जमाफी आणि पीककर्जाच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्यापार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी हे आव्हान दिलयं.

मंत्री मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे, वास्तविक चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना झालेल्या पीक कर्ज वाटपाची वस्तुनिष्ठ माहिती आधी घ्यायला हवी होती. ही माहिती घेऊन त्यांनी आंदोलन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात न येता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिथे शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झालेली नाही, तिकडे हे आंदोलन करायला हवे होते. संपूर्ण राज्यभर हे आंदोलन बँकांसमोर करण्याचा निर्णय भाजपने घेतला असताना कोल्हापुरात मात्र हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. यावरूनच त्यांच्यावर ओढलेली नामुष्की आणि त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील या आंदोलनाची हवा गेल्याचे स्पष्ट होते. केडीसीसी बँकेसह कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकाही शेतकऱ्यांना कर्ज देत असल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलयं.

केडीसीसीचे उद्दिष्टापेक्षा १५८ टक्के पीककर्ज वाटप –
मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा समन्वय समितीने केडीसीसी बँकेला २०२०-२०२१ या शेती हंगामासाठी एकूण खरीप इष्टांक ६८६ कोटी दिलेला आहे. प्रत्यक्षात केडीडीसी बँकेने १०८२ कोटी रुपये पीक कर्ज वाटप केले आहे. सरकारने दिलेल्या उद्दिष्टाच्या ही टक्केवारी १५८ टक्के आहे. पीककर्ज वाटपात केडीसीसी बँक राज्यात अव्वल असल्याकडेही मंत्री मुश्रीफ यांनी लक्ष वेधले आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीचे पैसे न येऊनसुद्धा शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.

This post was last modified on June 22, 2020 8:32 PM

Team Lokshahi News

Recent Posts

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ खात्यात करावा लागेल अर्ज…

मुंबई | राज्यातील आयटीआय पात्रता धारकांना सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली असून ऊर्जा विभागाच्या… Read More

October 23, 2020

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरातील चार जण ठार

एसटी बस इनोव्हा कार ची समोरासमोर जोरदार धडक, मयत कोल्हापूरातील कोपार्डे | कोल्हापूर गगनबावडा मार्गावर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई | राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी… Read More

October 23, 2020

भाजपमधील ‘या’ नेत्यांच्या सल्ल्यानेच मी राष्ट्रवादीत – एकनाथ खडसे

मुंबई | गेली ४० वर्षे भाजपसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे केल्यात ‘या’ महत्वाच्या मागण्या

मुंबई | महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी… Read More

October 23, 2020

हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार – वनमंत्री संजय राठोड

कोल्हापूर | हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार असल्याची ग्वाही वनमंत्री संजय राठोड यांनी… Read More

October 22, 2020