Categories: Featured सामाजिक

आम्ही रिक्षाचालकांनी आता आत्महत्या करायची का म्हणत ‘त्याने’ मांडली आपली व्यथा…

सातारा | गेल्या तीन महिन्यापासून देशात लॉकडाऊनची परिस्थीती असल्याने अनेक लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय. अशा परिस्थितीत हातावरचे पोट असणाऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे, परंतु यासर्वबाबतीत शासन अपयशी ठरल्याचे चित्र सध्यातरी दिसून येतय. सातारा जिल्ह्यातील एका रिक्षा व्यावसायिकाने फेसबुकवर पोस्ट लिहून हीच बाब सर्वांच्या निदर्शनास आणली असून आम्ही रिक्षाचालकांनी आता आत्महत्या करायची का असा प्रश्न विचारला आहे.

फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये या सातारकर रिक्षावाल्याने आपली समस्या मांडली असून त्याने गेली तीन महिने घरी बसून असल्याने आर्थिक परिस्थिती ढासळल्याचे म्हणटले आहे. सध्या शासनाने काही अटींवर रिक्षा चालवण्याची परवानगी दिली असली तरी अद्याप लोक रिक्षात बसत नसल्याने धंदा होत नाही. अशातच ट्रॅफिक पोलिस आणि फायनान्स घेतलेल्या कंपनीकडून पैशासाठी वारंवार त्रास दिला जात असल्याचेही त्याने म्हणटले आहे. 

कमाई होत नसताना ट्रॅफिकवाल्यांना दररोज पैसे कुठून द्यायचे, घरचा गाडा कसा ओढायचा, मुलाचे शिक्षण कसे करायचे, शासकीय पातळीवर मदतीऐवजी लुटच होत असल्याने हतबल झालेल्या या रिक्षाचालकाने आता शेतकऱ्यांप्रमाणेच रिक्षाचालकांनीही आत्महत्या करायची का असा सवाल उपस्थित केला आहे. रिक्षाचालकांने मांडलेली ही व्यथा प्रशासनं गांभिर्याने घेणारं का हे पाहणं आता महत्वाच आहे.

Team Lokshahi News