मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक पदांच्या एकूण 800 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.
- परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट–ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2022
- पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक
- पद संख्या – 800 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
- अमागास – रु. 394/-
- मागासवर्गीय- रु. 294/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जून 2022
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2022
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
- PDF जाहिरात (Adv.049 – 53/ 2022) – https://cutt.ly/aKnBoUh
- ऑनलाईन अर्ज करा – https://bit.ly/3mXrwAb
- सदर पदांकरिता अर्ज सुरू होण्याची तारीख 25 जून 2022 आहे.
- नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
- विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
- परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.
MPSC पूर्व परीक्षेतील रचनेत महत्वपूर्ण बदल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षेतील रचनेत महत्वपूर्ण बदल केलाय. त्यानुसार आता सिसॅटचा पेपर हा आर्हता प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. या पेपरमध्ये ३३ टक्के गुण प्राप्त उमेदवारांचे पेपर क्रमांक एकमधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. या निर्णयामुळे कला, वाणिज्य शाखेतील उमेदवारांचे मुख्य परीक्षा देण्याचे प्रमाण वाढेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
असा असेल बदल..
आता राज्यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा पेपर क्रमांक दोन तपासल्यानंतर, ज्या उमेदवारांना किमान ३३ टक्के गुण अर्थात ६६ किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त असतील अशा उमेदवारांचा पेपर क्रमांक एक तपासला जाईल. पेपर क्रमांक एकच्या गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
“सिसॅटचा पेपर पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार असल्याने कला, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. आत्तापर्यंत सिसॅटच्या गुणांमुळे विज्ञान शाखा, तंत्रशिक्षण असलेल्या उमेदवारांचे पारडे जड राहात होते. आता सर्वांना समान संधी उपलब्ध होऊ शकतील.”