मुंबई | शेती पिकांचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने सरकारच्यावतीने अनेक योजना राबवण्यात येत आहेत. यातील बहुतांशी योजनांमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देखील दिली जाते. कृषि विभागाच्या या योजनांमध्ये प्रामुख्याने खालील योजनांचा समावेश होतो. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपले सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृषी यांत्रिकीकरणच्या ट्रॅक्टर, पाॅवर टिलर, पाॅवर वीडर, रोटाव्हेटर, सिंगल पल्टी, डबल पल्टी, मिनी राईस मिल इ.औजारांकरिता mahadbtmahait.gov.in या लिंकवर अर्ज करू शकता.
योजनांच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.