Categories: प्रशासकीय राजकीय

निवडणूक लढवताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

कोल्हापूर | एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित सुमारे 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन विहीत नमुन्यातील अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाचे संशोधन अधिकारी सचिन साळे यांनी केले.

ऑनलाईन फी भरल्याची पावती- दोन प्रतीत, तहसिलदार/निवडणूक निर्णय अधिकारी यांचे पत्र, तहसिलदार /निवडणूक निर्णय अधिकारी यांचे प्रमाणपत्र नमुना 15 A, अर्जदाराने जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाईन भरलेला अर्ज, अर्जदाराच्या जातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत महिला उमेदवारांचे बाबतीत जातीचे दाखल्यावर Daughter of (वडीलांचे नाव असलेला) असा उल्लेख आवश्यक आहे. अर्जदाराच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत, अर्जदाराच्या आजोबांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित प्रत, अर्जदाराकडे मानीव दिनांकापूर्वीचा जात नोंद असलेला शालेय पुरावा उपलब्ध नसल्यास मानीव दिनांकापूर्वीचे महसूली/ जन्म मृत्यू नोंदीचे पुरावे सादर करावेत ज्यामध्ये जातीचा उल्लेख आहे, रक्तनात्यातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र असल्यास सदर प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत व त्यांचेशी नातेसंबंध सिध्द होणारे महसुली पुरावे आवश्यक, नमुना 3 मधील शपथपत्र (पुरावेधारकासह नावे वंशावळीत नमुद असावीत) नमुना 21 मधील शपथपत्र अधिक माहितीसाठी www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच टोल फ्री क्र. 18002330444 वर संपर्क करावा.

महत्वाचे- उमेदवाराच्या अर्जावर विहीत मुदतीत कार्यवाही पूर्ण होण्यासाठी उमेदवारांनी निवडून आल्यानंतर 7 दिवसात जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जाहीरनामा सादर करणे बंधनकारक आहे.

Team Lokshahi News