Categories: Featured महिला

देशातील महिलांना पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकाऊंटवर झळकण्याची संधी, कसे ते वाचा…

नवीदिल्ली। सोशल मिडीयावर सर्वाधिक फॉलो केले जाणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच सोशल मिडीयाला रामराम ठोकणार असल्याचे म्हणटले होते. यासंदर्भात त्यांच्या ट्विटमुळे अनेकजण कोड्यात पडले.यानंतर आज पंतप्रधांनानी एक महत्वपूर्ण ट्विट केलं असून  खुद्द मोदींच्या ट्विटर हॅंडलवर देशातील महिलांना झळकण्याची संधी मिळणार आहे.

येत्या रविवारी अर्थात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे. यानिमित्तानं एका प्रेरणादायी महिलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल मीडिया हँडलवर झळकण्याची संधी दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ट्विटरच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे.  पंतप्रधानांकडून सुरु करण्यात आलेल्या SheInspiresUs या नव्या उपक्रमाद्वारे आयुष्याला प्रेरणा देणाऱ्या महिलांचा गौरव यानिमित्तानं केला जाणार आहे. त्यांचे विचार मोदींच्या सोशल मीडिया हँडलमार्फत जगभरात पोहोचवले जाणार आहेत. 

या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटर हॅंडलव्दारे केले आहे. मोदींचे ट्विटरवर तब्बल ५३.४ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. तर फेसबुकवर त्यांना साडेचार कोटी लोक फॉलो करतात. इन्स्टाग्रावरही त्यांच्या फॉलोवर्सचा आकडा हा ३५.२ दशलक्षच्या घरात आहे. या विविध सोशल मीडिया व्यासपीठाद्वारे प्रेरणादायी महिला आपल्या विचारांनी, कार्यानं जगभरातील लोकांना प्रेरित करणार आहेत. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: sheinspiresus पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रेरणादायी महिला मोदी ट्विटर मोदी सोशल मिडीया