Categories: Featured कृषी

राज्यमंत्री बच्चू कडू म्हणतात दोन लाखांची कर्जमाफी म्हणजे…

पुणे। दोन लाख रुपयांच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर देत ही कर्जमाफी म्हणजे बुजगावणं असल्याचं म्हणटलं आहे. आतापर्यंत आम्हाला किती लुटलं गेलं याचा हिशोब केला तर सरकारकडेच आमचे पैसे निघतील, असंही बच्चू कडू म्हणाले. आळंदी येथे वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केलयं. 

यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर देखील जोरदार टीका केली. “तूरडाळीला हमीभाव देणं आणि ते जाहीर करणं हे केंद्र सरकारच्या हातात आहे. पण केंद्र ते काम करत नाही”, अशी खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली. “तुरीच्या आयात-निर्यातीच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांचं नुकसान झालं. हे नुकसान अगणित असून त्याचा अंकात विचारही करता येणार नाही”, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

सरकार “कायद्यावर कायदे आणत आहे. पण शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा या सरकारला करता येत नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.  

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Bachchu Kadu on Farmer’s loan Waiver Farmer loan waiver Scheme कर्जमाफी योजना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकरी कर्जमाफी