Categories: कृषी

शेतकरी कर्जमाफी बद्दल आ. बच्चू कडू काय म्हणाले?

मुंबई।२२ डिसेंबर। राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्यावतीने करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी स्वागत केले असले तरी २ लाख रुपयांच्या निर्णयामुळे ते पूर्ण समाधानी नसल्याचे स्पष्ट झालयं. शेतकऱ्यांवर कर्जच घ्यायची वेळ येऊ नये अशी धोरणे राबवणे गरजेचे असून शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केलय. 

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी कोण पात्र? महत्त्वाच्या बाबी काय?

सध्याचा कर्जमाफीने कोरडवाहु शेतकऱ्यांना विशेषतः विदर्भ,मराठवाडा या भागातील कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. यापैकी ७५ टक्के शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होण्याची अपेक्षा आहे. मात्र फळ उत्पादन व बागायतदार शेतकऱ्यांच्या साठी वेगळे धोरण ठरवावे लागेल अशी अपेक्षा आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलीय.

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानी संदर्भात देखील दिली जाणारी मदत वाढवणे गरजेचे असल्याचे मत कडू यांनी व्यक्त केलय. त्याचबरोबर पेरणी ते कापणी या कामाचा समावेश मनरेगात करावा या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी या कर्जमाफीच्या निमित्ताने पुन्हा एकदा केला आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: cm Uddhav Thackeray Mahatma jyotiba Phule farmer loan waiver scheme MLA Bacchu kadu on Farmer loan waive कर्जमाफी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शेतकरी कर्जमाफी योजना २०१९