Categories: Featured

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता बांबू लागवड ते विक्री, सर्वकाही एकाच छताखाली तेही कोल्हापूरात..!

कोल्हापूर | देशातील विविध सेवाक्षेत्र आणि व्यवसायातील रोजगाराच्या संधी कमी झाल्याने अनेकजण शेतीकडे वळू लागले आहेत. यापैकी बहुतांशी लोकांचा कल पारंपारिक शेतीऐवजी आधुनिक शेतीकडे असल्याचे दिसत आहे. याच हेतूने कमीत कमी खर्चात आणि कष्टात दिर्घकालीन गुंतवणुकीच्या पर्यायांचा देखील अनेकजण विचार करत आहेत. त्यासाठी बांबू शेतीचा पर्याय निवडला जात असून एखाद्या ठिकाणी पडीक जमीन असेल अथवा डोंगराळ भागातील जमिनीत बांबू शेती केली जात आहे. 

वास्तविक पाहता, व्यावसायिक पध्दतीने बांबू शेतीचा प्रयोग यापूर्वीच यशस्वी ठरल्याने सध्या बांबू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे. अशा शेतकऱ्यांपासून ते उत्पादकांपर्यंत सर्वांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा उपक्रम कोल्हापूर बांबू फोरमच्या माध्यमातून केला जात आहे. बऱ्याचदा अनेक शेतकरी आपल्या शेतात बांबू शेती करण्यासाठी धडपडतात, परंतु त्यांना बांबू शेतीची पुरेशी माहिती उपलब्ध होत नाही, बांबू शेती आणि व्यवसायातील अनेक तज्ञ आहेत, जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू इच्छितात, मात्र या सर्वांना एकाच छताखाली आणणारे व्यासपीठ उपलब्ध नाही. बांबू शेती आणि व्यवसायासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी ठिकाण उपलब्ध नाही.या सर्वांना एकत्र जोडण्यासाठी आणि बांबूपासून विविध प्रॉडक्ट तयार करणारे कारागिर, नर्सरी व्यावसायिक, बांबू सप्लायर या सर्वांना एकत्र करण्याच्या हेतूने हे फोरम तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून बांबूपासून तयार होणारे सर्व प्रॉडक्टही एकाच छताखाली पहायला मिळणार आहेत.

शेतकरी आणि उद्योजक यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या या फोरमचे समन्वयक म्हणून बांबू विषयातील एक्स्पर्ट असलेले अरुण वांद्रे काम पाहत आहेत. त्यांच्यासह अनंतकुमार जाजल, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट क्षेत्रातील आशपाक मकानदार ही तज्ञ मंडळी देखील फोरमच्या समन्वयक पदी काम करत आहेत. 

  • आशपाक मकानदार यांच्याकडे, बांबूपासून कारागीर फर्निचरसह विविध प्रकारचे विणकाम करून वस्तू तयार केल्या जातात. या वस्तूंना देश विदेशात मोठी मागणी असून अशा वस्तू फोरमच्या माध्यमातून एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत.
  • शेतकऱ्यांना बांबू लागवडीविषयी माहिती हवी असेल तर त्यांना आठवड्यातून ठराविक दिवशी ट्रेनिंगची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
  • यावसायिकदृष्ट्या वापरासाठी महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाने शिफारस केलेल्या जाती फोरमच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. या जातींची लागवड करण्यापासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

सध्याच्या उपलब्ध आकडेवाडीनुसार, भारतात बांबू लागवडीखालील क्षेत्र १३.९६ दशलक्ष हेक्टर आहे. देशात जवळपास १३६ प्रजातींचे बांबू आढळतात. यामध्ये देशी १२५ प्रजाती आहेत. तर विदेशी ११ प्रजातींचा समावेश आहे. बांबूपासून मिळणारे राष्ट्रीय उत्पन्न १४.६ दशलक्ष मे. टन आहे. महाराष्ट्राप्रमाणे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात व्यावसायिक पद्धतीने बांबू लागवडी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यात साधारणतः ३०० एकर परिसरात बांबूची लागवड करण्यात आली असून त्याचे व्यावसायिक पद्धतीने उत्पादन घेतले जात आहे.

  • संपर्क –
    • अरूण वांद्रे – 8830084317
    • अनंतकुमार जाजल – 9604025454
    • कोल्हापूर बांबू फोरम, स्टेशन रोड, पोस्ट ऑफिस शेजारी, कोल्हापूर
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Bamboo Nursery Bamboo Planting Grant Bamboo Planting pdf Bamboo Varieties Commercial Bamboo Planting Information about Bamboo Marathi Maharashtra Bamboo Development Corporation Manga Bamboo Planting बांबू जाती बांबू रोपवाटिका बांबू लागवड pdf बांबू लागवड अनुदान बांबू विषयी माहिती मराठी महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ माणगा बांबू लागवड व्यावसायिक बांबू लागवड