Categories: राजकीय

उध्दवजी ‘या खेकड्याची वेळीच नांगी मोडा’ तानाजी सावंतांविरोधातील बॅनरबाजी सोशल मिडीयावर व्हायरल

सोलापूर। उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भाजपला साथ दिलेल्या नाराज तानाजी सावंत यांच्याविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली असून “हा खेकडा शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा,” अशी विनंती मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसैनिकांनी केली आहे. हा बॅनर सोलापुरात सध्या चांगलाच चर्चेचा विषय  ठरला आहे.

मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असलेले शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत भाजपला साथ दिली. या कारणामुळे सोलापुरातील शिवसेना कार्यकर्ते नाराज झाले होते. याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी हा बॅनर उभारला आहे. सोलापुरातील मेकॅनिक चौक परिसरात हा बॅनर लावण्यात आला आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीला धक्का देत भाजपला साथ दिली होती. त्यामुळे आमदार तानाजी सावंत यांच्या गटातील सात सदस्यांनी भाजपा पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा दिला होता. भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची निवड झाली आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शेतकरी प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या ठिकाणी आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीलाही तानाजी सावंत अनुपस्थितीत होते. तसेच विशेष अधिवेशनादरम्यानही तानाजी सावंत गैरहजर होते.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Best car insurance Best insurance Business Insurance buy online insurance buy online insurance for farmer family health care farmer insurance farmers health insurance get online insurance health care insurance India news Insurance quotes jaggery market kolhapur market latest news Liability Insurance loan insurance market market yard Shivsena sukanya smridhi yojana tanaji sawant Uddhav Thackeray भारत सरकारच्या योजना सुकन्या समृध्दी योजना