मुंबई | दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result 2022) काही दिवसात जाहीर होणार आहे. यंदा परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं झाल्यामुळे लवकरच अकरावी आणि डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रवेश कुठे आणि कोणत्या शाखेतू घ्यायचा याबद्दल मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

अनेकदा विद्यार्थी पॉलिटेक्निक की बारावी (Engineering diploma or 12th) यासंदर्भात संभ्रमात असतात. यापैकी पुढील शिक्षणाच्या दृष्टीनं चांगला पर्याय कोणता याबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यातील चांगल्या पर्यायांबाबत सांगणार आहोत.

इंजिनीरिंग डिप्लोमा / पॉलीटेक्नीक :
दहावीनंतर थेट इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश मिळतो. हा डिप्लोमा तीन वर्षांचा आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ज्युनिअर इंजिनीअरची नोकरी मिळत. विशेष म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअर व्हायचा असेल तर तुमच्या पुढील शिक्षणासाठी पॉलिटेक्निक हा उत्तम पर्याय असतो. यामध्ये इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, सिव्हिल, कम्युटर अशा अनेक ब्रांचमध्ये शिक्षण घेता येतं. इंजिनिअरिंगचे बरेचशे मुद्दे डिप्लोमा करताना समजतात आणि त्यामुळे पुढे अडचण येत नाही. प्रॅक्टिकल ज्ञानसाठीही डिप्लोमा हा उत्तम पर्याय आहे.

  • डिप्लोमाला प्रवेश घेतल्यानंतर जर इतर कोणत्या शाखेत म्हणजे कॉमर्स, कला क्षेत्रात जाण्याची तुमची इच्छा झाली तर ते शक्य होत नाही. यासाठी बारावी असणं महत्त्वाचं असतं. डिप्लोमानंतर डिग्रीसाठी इंजिनिअरिंगशिवाय दुसरा पर्याय नसतो. बरेच विद्यार्थी डिप्लोमानंतर जॉबही करतात. अशा विद्यार्थ्यांना सुपरवायजर किंवा ज्युनिअर इंजिनिअर म्हणून जॉब मिळतो.

बारावीसाठी प्रवेश :
दहावीनंतर बरेच विद्यार्थी अकरावी आणि बारावी करतात. यामध्ये विद्यार्थ्यांना अकरावीची परीक्षा कॉलेजकडूनच असते मात्र बारावीमध्ये बोर्डाची परीक्षा असते. ज्या विद्यार्थ्यांना कॉमर्स, आर्ट्स या शाखांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना बारावीशिवाय दुसरा पर्याय नसतो. तसंच अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी बारावीनंतर JEE ची परीक्षा देतात. ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर नक्की कोणत्या क्षेत्रात डिग्री घ्यायची आहे हे माहिती नसतं त्यांना बारावीला प्रवेश घेता येऊ शकतो. त्यानंतर उपलब्ध असणाऱ्या पर्यांयामधून चांगल्या पर्यायाची निवड करून पदवी पूर्ण करता येते. पदवीनंतर सरकारी नोकरीसाठी अथवा स्पर्धा परिक्षांसाठी अर्ज करता येतात. हा देखील करिअरच्या दृष्टीने चांगला पर्याय आहे.