भूमी अभिलेख कार्यालयात नोकरीची संधी, १०२० जागांसाठी लवकरच भरती

मुंबई | भूमी अभिलेख कार्यालयात 1020 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आलीय. सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने या कार्यालयाकडील संदर्भीय पत्रानुसार आपले अधिनस्त विभागातील गट क पदसमूह 4 संवर्गातील सरळसेवा कोट्यातील बिंदुनामावली अद्यावत करून विभागीय मागासवर्गीय कक्षाकडून तपासणी करून घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

महसूल व वन विभागाकडील दिनांक 27/7/2021 रोजीचे पत्रानुसार भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह 4 संवर्गातील सरळसेवा कोट्यातील माहे मार्च 2021 अखेर रिक्त असणारी 1020 पदे सरळसेवेने भरण्याकरिता शासन मान्यता प्राप्त झाली आहे.

शासनाकडील मान्यतेनुसार भूमी अभिलेख विभागाकडील सरळसेवेच्या रिक्त पदांवर पदभरती करणेकामी माहे नोव्हेंबर अखेर जाहीर प्रसिद्ध करण्याबाबत नियोजन करावे, असे माननीय जमाबंदी आयुक्त महोदयांनी निर्देश दिले आहेत.

भूमि अभिलेख विभागातील गट ‘क’ संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल व वन विभागामार्फत याबाबतचा शासन आदेश 25 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.