Categories: Featuredकृषी

केंद्रीय कॅबिनेट बैठकीत शेतकरी, मजुर यांच्यासह इतर घटकांसाठी मोठ्या घोषणा

नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या अंतर्गत शेतकऱ्यांसह मजुर आणि हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या घटकांसाठी काही घोषणा करण्यात आल्या. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज या संदर्भात पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर देखील उपस्थित होते.

प्रकाश जावडेकर म्हणाले, “सरकारने आज शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. आधी जे पॅकेज घोषित झालं तेव्हा या निर्णयाबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. या निर्णयानुसार सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला खर्चाच्या दीडपड हमीभाव देण्याचं आपलं वचन पूर्ण केलं आहे. २०२०-२१ मधील खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या १४ पिकांसाठी सरकारने हमीभाव जाहीर केला आहे. या १४ पिकांसाठी शेतकऱ्यांना जवळपास ५०-८० टक्के अधिक किंमत मिळेल.”

सरकारने शेतकऱ्यांसाठीच्या अल्पमुदतीच्या ३ लाख रुपयांच्या कर्जाची मुदतदेखील ३१ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जाच्या व्याजात २ टक्के आणि फेडीच्या वेळी ३ टक्क्यांचा फायदा मिळेल. भारतसरकारकडून शेतकऱ्यांना ९ टक्के व्याजदराने कर्ज मिळतं. यात बँकेच्या व्याजात सरकार २ टक्के सुट देईल. तसेच वेळेवर कर्ज फेडल्यास ३ टक्क्यांची सुट मिळेल. अशाप्रकारे शेतकऱ्यांना ४ टक्क्याने ३ लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली.

याबरोबरच सरकारचं सर्वोच्च प्राधान्य गरिबांनाच आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच सरकार गरिबांच्या आवश्यकतांबाबत संवेदनशील राहिली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर दोनच दिवसात १ लाख ७० हजार कोटींचं पॅकेज घोषित करण्यात आलं होतं. ८० कोटी लोकांना अन्न सुरक्षा देण्यात आली. २० कोटी महिलांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत पोहचवण्यात आली. पीएम किसान योजनेंतर्गत कोट्यावधी शेतकऱ्यांना हप्त्याच्या स्वरुपात मदत देण्यात आली. यामुळे लॉकडाऊनमध्ये अडचणींचा सामना करावा लागला असता अशा अनेक गरिब नागरिकांना फायदा झाला आहे.”

हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनाही सरकार मदत करेल. यात सलून आणि इतर व्यवसायिकांचा देखील समावेश केला जाईल. आतापर्यंत सरकारने लॉकडाऊनच्या काळात ८० लाख टनापेक्षा अधिक अन्नधान्य गरजूंपर्यंत पोहचवलं. आत्मनिर्भर भारत अंतर्गत एक राष्ट्र एक राशन योजनेची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अनेकांना लाभ झाला. मच्छिपालनाला देखील आर्थिक मदत देण्यात आली आहे, असंही जावडेकर म्हणाले.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • देशात 6 कोटी एमएसएमई (MSME) आहेत. त्यांना ३ लाखाचे कर्ज २ टक्के व्याज दराने मिळणार. (एमएसएमईचं योगदान २९ टक्के)
  • एमएसएमईसाठी केंद्र सरकारची निर्यातीबाबत विशेष योजना, २ लाख एमएसएमईचं काम सुरु करणार.
  • एमएसएमईचं ५० हजार कोटींचं योगदान, एमएसएमईचा २५० कोटी रुपयांचा टर्न ओव्हर.
  • एमएसएमईला २० हजार कोटी मदत मिळाली.

This post was last modified on June 2, 2020 9:18 AM

Team Lokshahi News

Recent Posts

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ खात्यात करावा लागेल अर्ज…

मुंबई | राज्यातील आयटीआय पात्रता धारकांना सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली असून ऊर्जा विभागाच्या… Read More

October 23, 2020

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरातील चार जण ठार

एसटी बस इनोव्हा कार ची समोरासमोर जोरदार धडक, मयत कोल्हापूरातील कोपार्डे | कोल्हापूर गगनबावडा मार्गावर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई | राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी… Read More

October 23, 2020

भाजपमधील ‘या’ नेत्यांच्या सल्ल्यानेच मी राष्ट्रवादीत – एकनाथ खडसे

मुंबई | गेली ४० वर्षे भाजपसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे केल्यात ‘या’ महत्वाच्या मागण्या

मुंबई | महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी… Read More

October 23, 2020

हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार – वनमंत्री संजय राठोड

कोल्हापूर | हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार असल्याची ग्वाही वनमंत्री संजय राठोड यांनी… Read More

October 22, 2020