chandrkant dada patil
कोल्हापूर | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आता भाजपमधूनच करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाकडूनच त्यांना घरचा आहेर देण्यात आल्याचं दिसून आलं आहे. यामुळे चंद्रकांत पाटील यांची चिंता वाढली आहे.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी चंद्रकांतदादांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यासोबत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी या नेत्यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक गांभीर्याने घेतली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याचा आरोप कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे यावर चंद्रकांत पाटील काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.