Categories: बातम्या राजकीय

नाराज खडसेंना डावलून भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीवर दिली ‘या’ नेत्यांना संधी

नाराज खडसेंना भाजपकडून ठेंगाच!

मुंबई | भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून पक्ष संघटनेत अनेक बदल करण्यात आले आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज ही नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात तेजस्वी सूर्या यांच्याकडे युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर डॉ. रमन सिंह, अन्नपूर्णा देवी, मुकुल रॉय, जय पांड्या यांना पक्षाच्या उपाध्यक्ष पदी नेमण्यात आले आहे. कैलाश विजयवर्गीय हे महासचिव पदावर कायम आहेत. दरम्यान, बिहार निवडणुकीच्या तोंडावर राम माधव, मुरलीधर राव आणि अनिल जैन यांना महासचिव पदावरुन हटवून नवीन जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

 • महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना संधी देऊन भाजपने खेळली नवी चाल
  • पंकजा मुंडे ( महामंत्री)
  • विनोद तावडे ( महामंत्री)
  • विजया राहटकर ( महामंत्री)
  • सुनिल देवधर ( महामंत्री)
  • व्ही. सतीश (सहसंघटन मंत्री)
  • जमाल सिद्धिकी (अल्पसंख्यक मोर्चा)
  • संजू वर्मा (प्रवक्ते)
  • हिना गावित (प्रवक्त्या)

राज्यातील भाजपमधील महत्त्वाचे नेते पक्षावर नाराज असल्याचे पाहायला मिळाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री विनोद तावडे, एकनाथ खडसे यांना उमेदवारीपासून वंचित ठेवण्यात आले होते. तर पंकजा मुंडेंचा पराभव झाला होता. यावर नाराज पंकजा मुंडे व विनोद तावडेंना आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मानाचे स्थान देण्यात आले आहे. मात्र  नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

येथे पहा भाजपची नवी कार्यकारिणी

Team Lokshahi News