Categories: राजकीय

‘महाविकास आघाडी’च्या धसक्यानं प्रदेशाध्यक्षपद घेण्यास भाजपमधील दिग्गजांची माघार?

हे ही वाचा – देवेंद्र फडणवीस यांना सामान्य नागरिकाचं पत्र; सोशल मिडीयावर होतयं व्हायरलं!

मुंबई। भाजपच्या नेत्यानी महाविकास आघाडीचा चांगलाच धसका घेतल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद स्विकारण्यास कोणी तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पुढे येऊनही भाजपावर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. त्यानंतर राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्येदेखील महाविकास आघाडीचा फॉर्मुला राबवला जाऊ लागल्याने भाजपला एका पाठोपाठ एक असे करत सर्वच ठिकाणांवरून सत्तेवर पाणी सोडावे लागले. या सगळ्याचा धसका घेतल्याने आता भाजपचे राज्यातील पक्षनेतृत्वपद स्विकारण्यास कोणीही तयार नसल्याचे सांगण्यात येत नाही. हे ही वाचा – तर… ‘या’ ५०० रूपयाच्या नोटेचे ‘त्याला’ मिळाले असते ‘लाखो’ रूपये

यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यासाठी भाजपच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असायची मात्र आता तेच नेते पक्षाला सत्तेतून धोबीपछाड मिळाल्याने प्रदेशाध्यक्ष पद स्विकारण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक नावांची चर्चा झाली. प्रदेशाध्यपदाची १५ जानेवारीला निवड होणार आहे. मात्र, यासाठी शर्यतीत असणाऱ्या अनेक दिग्गजांनी यू टर्न घेतल्यानं चंद्रकांत पाटलांनाच पुन्हा प्रदेशाध्यक्ष केलं जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे याआधी प्रदेशाध्यक्षपदासाठी सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रेशखर बानवकुळे अशी मोठी-मोठी नावं चर्चेत होती. संघाच्या जवळच्या नेत्यांकडेच प्रदेशाध्यपद द्यावं, असा संघ नेत्यांचा सूर आहे. मात्र चंद्रकांत पाटील हे अमित शहांच्या जवळचे असल्यानं त्यांचीच वर्णी लागणार असल्याचं बोललं जातंय.

विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष असतानाच भाजपला राज्यातील सर्व ठिकाणी सत्तेतून बाहेर पडावं लागलं आहे, त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद देण्यास अनेक नेत्यांचा आक्षेप देखील असल्याचे सांगितल जात आहे. त्यामुळे राज्यातील अपयशाची जबाबदारी घेऊन राज्यातील नेतृत्वाने आपली पदं सोडावीत, अशीही मागणी  भाजपच्या एका गटाकडून सुरू असल्याची चर्चा आहे. परंतु या अपयशाच्या जबाबदारीनंतर नव्या जोमाने पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी कोणीही समोर येत नसल्याचेही सांगितले जात आहे. वास्तविक चंद्रकांत पाटील यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष पद देण्यासाठीच ही राजनीती सुरू असल्याचेही काहीजण बोलत आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाची या पदासाठी जोरदार चर्चा सुरु होती. त्यांच्या नाराजीनाट्याची दखलही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेत त्यांची मनधरणी केली होती. अशातच अचानक त्यांचंही नाव प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाहेर पडलं आहे. त्यामुळेही राजकीय वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे आता १५ जानेवरीला भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पहावं लागणार आहे.

Team Lokshahi News