मुंबई | ‘खारीक’ हा ड्रायफ्रुटचा असा प्रकार आहे जो प्रत्येकाच्या घरी असतोच. खजूर-खारीक हे चवीला गोड असल्यामुळे ते अनेकांना आवडते. बऱ्याचदा सर्वांना चॉकलेटी रंगाच्या खजूराविषयी माहिती असते, परंतु आज आम्ही आपल्याला काळ्या खजूरांविषयी किंवा त्याच्या खारके विषयी माहिती देणार आहे.

काळ्या खजूरात चिकट गोडपणा आणि पौष्टिक मूल्यांचा आश्चर्यकारक साठा आहे. काळ्या खजूरांचा आकार लहान अंड्यासारखा गोलाकार असतो आणि तो 3-7 सेमी लांब असतो. त्यांचा व्यास 2-3 सेमी असतो. पिकल्यावर हे खजूर काळे होतात. या खजूरामध्ये 1 बी असते, जी सुमारे 2-2.5 सेमी लांब आणि 6-8 मिमी जाड असते. ही बी एका खडबडीत लगद्याने झाकलेले असते जे पिकल्यावर चिकट होते.

काळे खजूर हे लोह, फायबर आणि इतर आहारातील घटकांचा उत्कृष्ट स्रोत असण्याव्यतिरिक्त, यामध्ये टॅनिनचे प्रमाण देखील जास्त आहे, ज्याचा उपयोग क्लीन्सर आणि तुरट म्हणून केला जातो, ज्यामुळे आतड्यांसंबंधी रोगांपासून आराम मिळतो. खजूर अर्क, डेकोक्शन, सरबत किंवा पेस्टच्या स्वरूपात खाल्ल्याने घसा खवखवणे, सर्दी, ब्राँकायटिस आणि ताप यांमध्येही आराम मिळतो.

काळ्या खारीकचे आरोग्यविषयक फायदे
1. काळ्या खारकेमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि आहारातील फायबर जास्त प्रमाणात असतात.
2. त्यामध्ये एलिमेंटल फ्लोरिन देखील असते जे दात किडणे टाळण्यास मदत करते.
3. सेलेनियम, जे रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवते आणि कर्करोगापासून बचाव करण्यास देखील मदत करते. हे देखील काळ्या खजूरात अधिक आढळते.
4. रात्रभर पाण्यात भिजवून दुसर्‍या दिवशी सकाळी सरबत स्वरूपात सेवन केल्यास काळे खजूर रेचक औषधी म्हणून काम करतात.
5. महिलांसाठी मासिक पाळी आणि सुलभ प्रसुतीसाठी ती चांगली असते.
6. पुरुषांच्या आरोग्यासाठीही खारीक फायद्याची असते. वीर्यनिर्मितीसाठी खारीक खाण्याचा सल्ला दिला जातो.
7. हाडांच्या बळकटीसाठी खारीकाचे सेवन ही फायद्याचे असते. खारीकमध्ये फॉस्फरस,कॅल्शिअम,मॅग्नेशिअम, पोटॅशिअम असे घटक असतात. ज्यांना हाडांसंदर्भात काही व्याधी असतील तर त्यांनी खजूराचे सेवन करावे त्यामुळे हाडाला बळकटी मिळते. हाडांसंदर्भातील आर्थायटीस या आजारासाठी फायदेशीर ठरते.
8. महिलांमध्ये अॅनेमियाचा त्रास हा काही वयानंतर दिसू लागतो. अपुऱ्या आहारामुळे हा त्रास होऊ लागतो. खारीकच्या सेवनामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत मिळते. नैसर्गिक पद्धतीने रक्त वाढण्यासाठी काळी खारीक फायदेशीर ठरते.
9. काळ्या खारीक मध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन C,A (Rational) असते. जे त्वचेची इलास्टिसिटी चांगली ठेवण्यास मदत करते. अनेक ब्युटी प्रॉडक्टमध्ये रॅटिनॉल नावाचा घटक असतो. जो त्वचेसाठी फारच फायदेशीर असतो.
10. याच्या सेवनामुळे पिंपल्सचा त्रास होत नाही. त्वचेला नैसर्गिक मॉश्चरायझर मिळते. हेल्दी आणि ग्लोईंग त्वचेसाठी काळी खारीक हे वरदान आहे. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट घटक असतात जे त्वचेला इतर समस्यांपासून दूर ठेवण्याचे काम करतात. आणि यामधील अँटी एजिंग घटक त्वचेचे तारुण्य राखण्यास मदत करते.
11. केसांच्या आरोग्यासाठीही खारीक खूप चांगली असते. खजूरमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन असते जे केसांच्या वाढीला चालना देण्याचे काम करते. तसेच कोंडा, केसगळती कमी करण्यासाठी खारीक हे उत्तम आहे.