Categories: Featured

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या; बॉलिवूड हादरलं!

मुंबई | आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली आहे. वांद्र्याच्या राहत्या घरी गळफास घेत त्याने आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्याने आत्महत्या केली असून हे टोकाचे पाऊल उचललं आहे. परंतु सुशांतने आत्महत्या का केली याची ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांतने आत्महत्या केली, त्यादरम्यान त्याचे काही मित्र त्याच्या घरी होते. मात्र अचानक तो एका रुममध्ये निघून गेला. त्याला त्याच्या मित्रांनी आवाज दिला. मात्र त्याने रुममधून काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याच्या मित्रांनी दरवाजा तोडला आणि त्यावेळी तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. यानंतर त्याच्या मित्रांनी पोलिसांना फोन करत याबाबतची माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून तो मानसिक नैराश्येत होता. मात्र त्याने ही आत्महत्या नेमकी का केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अवघ्या काही काही दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजरने आत्महत्या केली होती.

सुशांत सिंह राजपूत याचा जन्म 21 जानेवारी 1986 रोजी झाला. त्याने छोट्या पडद्यापासून अभिनय क्षेत्रात पदापर्ण केले. स्टार प्लसवरील ‘किस देश मै हे मेरा दिल’ ही त्याची पहिली सिरीअल. त्यानंतर जवळपास तीन वर्षं त्याने झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या कार्यक्रमात काम केले. यात त्याने मानव ची भूमिका साकारली होती. 2013 मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे त्याचे सिनेमे गाजले. एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला. नुकतेच त्याचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट लोकप्रिय ठरले होते.

सुशांतने चित्रपट पदार्पण कोई पो चे (2013) या चित्रपटातून केलं. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला फिल्म फेअर अॅवार्ड फॉर बेस्ट मेल डेब्युटसाठी नामांकन मिळालं. यानंतर त्याने शुद्ध देसी रोमान्स (2013) या चित्रपटात काम केलं. तसेच सुशांतने सर्वाधिक गल्ला गमावणाऱ्या आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या पीके चित्रपटात देखील काम केलं. या चित्रपटात त्याने सहाय्यक कलाकाराची भूमिका केली होती. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ड्राईव्ह हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला. दिल बेचारा या चित्रपटाचं शूटिंग लॉकडाऊनमुळे थांबलं होतं.

चित्रपट

2013- काय पो छे
2013 – शुद्ध देसी रोमान्स
2014 – पी. के
2015 डिटेक्टिव ब्योमकेस बक्सी
2016 – एम.एस. धोनी – द अनटोल्ड स्टोरी
2017- रबता
2018 – चंदा मामा दूर के
2018 – केदारनाथ

मालिका

2008–2009: किस देश में है मेरा दिल
2009–2011: पवित्र रिश्ता
2010–2010: ज़रा नचके दिखा – (सीज़न 2)
2010–2011: झलक दिखला जा 4

Team Lokshahi News