Categories: Featured

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरातील चार जण ठार

एसटी बस इनोव्हा कार ची समोरासमोर जोरदार धडक, मयत कोल्हापूरातील

कोपार्डे | कोल्हापूर गगनबावडा मार्गावर कळंबे तर्फ कळे (करवीर) येथे एसटी बस व इनोव्हा कार गाडीचा भीषण अपघात झाला, एसटीने कारला दिलेल्या धडकेत चार ठार झाले आहेत.

अपघातात ठार झालेल्यांची नावं अशी ६५ वार्षिय आक्काताई दिनकर मळवे , ४५ वार्षिय संजय दिनकर, माळवे , ३६ वर्षिय पुजा संजय माळवे आणि २४ वर्षिय करण दिपक माळवे सर्व राहणार विक्रमनगर कोल्हापूर इथले आहेत.सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली.

घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कणकवली डेपो एसटी एम एच १३ टी यू ८७३४ कोल्हापूरला येत होती. याच वेळी विक्रम नगर कोल्हापूर येथून कळे ता. पन्हाळा येथे नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी माळवे कुटुंब इनोव्हा कार न एम एच ०९ बी डब्ल्यू ४१४१ निघाले होते.

कळं‌‌‌‌‌बे तर्फे कळे ता. करवीर येथे एका छोट्या वळणावर  एसटी बसने इनोव्हा गाडीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात करण दिपक माळवे. वय २७, संजय दिनकर माळवे. वय ४४, आक्काताई दिनकर माळवे. वय ६५ हे जागीच ठार झाले. तर पूजा संजय माळवे ही उपणारदरम्यांन मृत्यु पावली आहे.

यात १६ वर्षिय समर्थ संजय माळवे , ४० वर्षिय नंदा दिपक माळवे , ५० वर्षिय सुनिता भगवान चौगले सर्व राहणार विक्रम नगर,कोल्हापूर हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गेल्या चार वर्षांत गमवावा लागला १५ जणांना जीव

रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी आहे. यामुळं अशा वळणावर वाहनं आली असता झाडे झुडपांच्यामुळं समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. यामुळं मोठे अपघात वारंवार होत आहेत. आज ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी गेल्या चार वर्षांत १५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर काही  तास वाहतुकीची कोंडी झाली.

दरम्यान, अपघात झाल्या नंतर पलायन केलेले एसटी चालक इरफान दगडू मुल्लाणी (रा.कणकवली) व वाहक अशोक शंकर पुजारी( रा. सांगली)हे दोघेही सायंकाळी पाचच्या दरम्यान स्वतःहून करवीर पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत.

Team Lokshahi News