Categories: गुन्हे

Breking News: बार्शी-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात, ४ ठार, ५ जखमी

सोलापूर। बार्शी -सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. एसटी आणि खासगी जीपची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला आहे. बार्शी तालुक्यातील शेलगावजवळ ही दुर्घटना घडली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, एसटी क्रमांक एमएच १४ बीटी ३७७५ ही सोलापूरहून बार्शीकडे जात असताना, सोलापूरकडे येत असलेली क्रुझर जीप एमएच १३ सीएस ६२३१ या भरधाव वेगात निघालेल्या जीपने एसटीला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यात ४ जणांचा जागीच मृत्यु झाला आहे. पाच जण जखमी झाले असून यात पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांचाही समावेश आहे. जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूर शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Team Lokshahi News